Bihar Bhawan Saam Tv
मुंबई/पुणे

Bihar Bhawan: मुंबईत तयार होणार बिहार भवन, ३० मजली इमारतीसाठी ३१४ कोटींचा खर्च; फायदा नेमका कुणाला होणार?

Bihar Bhawan In Mumbai: मुंबईमध्ये बिहार भवन बांधले जाणार आहे. बिहार सराकरने याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. ही ३० मजली इमारत असून त्यासाठी तब्बल ३१४ कोटींचा खर्च येणार आहे.

Priya More

Summary:

  • दिल्लीनंतर आता मुंबईत बिहार भवन बांधले जाणार आहे

  • बिहार सरकारने याबाबत मोठी घोषणा केली

  • मुंबईतल्या एल्फिन्स्टन इस्टेट या परिसरात हे बांधले जाईल

  • गरजू व्यक्ती, रुग्ण आणि सरकारी अधिकारी यांना याचा फायदा होईल

दिल्लीनंतर आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये बिहार भवन बांधले जाणार आहे. बिहार सरकारने याबाबत घोषणा केली. १३ जानेवारीला बिहारच्या मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बिहार सरकारने या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी सविस्तर आराखडा तयार केला आहे. हे बिहार भवन मुंबईच्या मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एल्फिन्स्टन इस्टेट येथे बांधले जाणार आहे. बिहारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३१४.२ दशलक्ष रुपयांच्या या बिहार भवनाच्या प्रोजेक्टसाठी मंजुरी देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत तयार होणाऱ्या या बिहार भवनाची इमारत अंदाजे ३० मजली असणार आहे. ही इमारत आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. त्याची उंची जमिनीपासून अंदाजे ६९ मीटर असेल. ही इमारत. ०.६८ एकर जमिनीवर बांधली जाईल. या इमारतीमध्ये एकूण १७८ खोल्या असतील. या इमारतीमध्ये सरकारी अधिकारी आणि गरजू व्यक्तींना राहता येईल.

बिहार भवनाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बिहारवरून मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या गंभीर आजार असलेल्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी विशेष राहण्याची व्यवस्था केली जाईल. कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी मुंबईमध्ये येणाऱ्यांसाठी २४० खाटांचे वसतिगृह देखील बांधले जाईल. ज्यामुळे या रुग्णांना सुरक्षित राहण्याची व्यवस्था मिळेल. त्याचसोबत मुंबईमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील याचा फायदा होईल.

बिहार भवन या इमारतीमध्ये सरकारी बैठका आणि कार्यक्रमांसाठी ७२ क्षमता असलेला आधुनिक कॉन्फरन्स हॉल देखील असेल. कॅफेटेरिया, वैद्यकीय कक्ष आणि इतर आवश्यक सुविधा देखील या इमारतीमध्ये उपलब्ध असतील. वाहन पार्किंगच्या समस्या सोडवण्यासाठी सेन्सर आधारित स्मार्ट ट्रिपल आणि डबल डेकर पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे या ठिकाणी एकाच वेळी २३३ वाहने पार्क केली जाऊ शकतील.

बिहारच्या बांधकाम विभागाचे सचिव कुमार रवी यांनी सांगितले की, मुंबईमध्ये बिहार भवनाचे बांधकाम हे राज्यातील प्रगती आणि सार्वजनिक कल्याणाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल असणार आहे. यामुळे सरकारी कामकाज आणखी सुलभ होईल. तर वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईमध्ये येणाऱ्या हजारो बिहारी नागरिकांनाही मोठा दिलासा मिळेल. ही इमारत बिहार सरकारची सामाजिक जबाबदारी आणि आधुनिक विकास दृष्टिकोन देखील प्रतिबिंबित करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिक जिल्ह्यात किसन सभेचा चांदवड-नांदगाव येथे रास्ता रोको

Ladki Bahin Yojana: eKYC केली पण खात्यात डिसेंबरचे ₹१५०० आलेच नाही; लाडक्या बहिणींचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

Mayor Reservation: मोठी बातमी! 'या' दिवशी ठरणार तुमचा महापौर, राज्य सरकारकडून तारीख जाहीर

Vangyache Bhaji Recipe: जेवताना तोंडी लावायला बनवा वांग्याची कुरकुरीत भजी; सर्वजण आवडीने खातील

Ladki Bahin : ₹१५०० बंद झाले, लाडक्या बहि‍णी संतापल्या, ४ जिल्ह्यातील महिलांचा उद्रेक, रस्त्यावर उतरल्या अन्...

SCROLL FOR NEXT