Pune ISIS Module Case Saam TV
मुंबई/पुणे

Pune Breaking News: पुणे ISIS दहशतवादी प्रकरणात मोठी अपडेट; NIA तपासात धक्कादायक माहिती उघड

Pune ISIS Module Case: दहशतवाद्यांचा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट होता, अशी धक्कादायक माहिती NIA च्या तपासात समोर आली आहे.

Satish Daud

Pune ISIS Terrorism Module Case

पुणे ISIS दहशतवादी प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. दहशतवाद्यांचा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट होता. यासाठी त्यांनी पुण्यातील कोंढवा भागात बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते, अशी धक्कादायक माहिती एनआयएच्या तपासातून समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इतकंच नाही, तर दहशतवाद्यांनी पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलांमध्ये जाऊन बॉम्बस्फोटाचा सराव केल्याचंही समोर आलं आहे. पुणे ISIS शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त केल्याप्रकरणी एनआयएने बुधवारी (13 मार्च) पहिले पुरवणी आरोपपत्र दाखल केले. (Latest Marathi News)

या आरोपपत्रात मोहम्मद शाहनवाज आलम, रिझवान अली, अब्दुल्ला शेख, तल्हा लियाकत खान अशा चार आरोपींची नावे जोडण्यात आली आहेत. यातील मोहम्मद इमरान मोहम्मद युनूस खान, मोहम्मद याकूब साकी या २ दहशतवाद्यांना १८ जुलै २०२३ रोजी पुणे पोलिसांनी अटक केली होती.

तर, इमरान शेख आणि मोहमद यूनुस साकी यांना चोरीच्या गुन्ह्यात पकडण्यात आलं होतं. सर्व आरोपी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून ते दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे.

आरोपींचा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याचा कट होता, यासाठी त्यांनी पुण्यातील कोंढवा भागात बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते, असं NIA तपासात समोर आलं आहे. याशिवाय महाराष्ट्रात दहशत पसरवण्याच्या मोठ्या कटात हे सर्व आरोपी सामील होते, अशी माहितीही देखील समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT