Pune Crime News  Saam Tv News
मुंबई/पुणे

Satish Wagh Case: सतीश वाघ प्रकरणात मोठी अपडेट, नवऱ्याला संपवण्यासाठी ६ महिन्यांपासून तयारी होती सुरू

Pune Crime News: अक्षय सतीश वाघ यांच्याकडे २००१ मध्ये तो ९ वर्षाचा असताना आई-वडिलांसोबत भाडेकरू म्हणून आला होता. हे कुटूंब १५ वर्षाहून अधिक काळ त्यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहिले होते.

Dhanshri Shintre

सतीश वाघ आणि मोहिनी वाघ यांच्या मुलाच्या मित्रासोबत मोहिनी वाघचे असलेल्या अनैतिक संबंधातून पती सतीश वाघ यांची हत्या घडवून आणल्याचं उघड झालं आहे. अपहरण करून खून केल्यानंतर आरोपींनी हत्यार भीमा नदीत टाकले. आरोपी नवनाथ गुरसाळे व त्याचा साथीदार आरोपी अतिश जाधव या दोघांनी मिळून सतीश वाघ यांच्या खुनासाठी वापरलेले हत्यार नदीत टाकले. पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून पेरणे फाटा येथे भीमा नदीत हत्यार पात्रात टाकले. दोन्ही आरोपींच्या माध्यमातून हत्यारांची शोध घेवुन ते जप्त करावयाचे असल्याची पोलिसांनी न्यायालयाला माहिती दिली.

खुनाच्या सुपारीसाठी ठरलेल्या रक्कमेपैकी मोहिनी वाघने किती पैसे अक्षय जावळकर याला दिले? हे पैसे कशा प्रकारे देण्यात आले याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. पुण्यातील हडपसरमधील व्यावसायिक सतीश वाघ यांच्या खूनप्रकरणात त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या चौकशीत प्रमुख तीन कारणे बाहेर आली आहेत.

नवऱ्याला संपवण्याची तयारी सहा महिन्यांपासून सुरु होती. अक्षय जावळकर याच्या मदतीने ६ महिन्यांपासून खुनाचा प्लॅन तयार करण्यात आला होता. आरोपींनी सतीश वाघ यांच्या प्रत्येक हालचालींची अपडेट ठेवली होती. सतीश वाघ यांचा खून करण्यासाठी ५ लाख रुपयांची सुपारी ठरवण्यात सुद्धा मोहिनीचा हाथ होता. मोहिनी वाघ हिच्याकडून ६ महिन्यापूर्वी नवऱ्याला मारण्याचा डाव रचला गेला. नवऱ्याच्या जाचाला कंटाळून तसेच सगळी आर्थिक ताकद आपल्याकडे येईल याच भावनेतून हा खून करण्यात आला. मोहिनी हीचे व अक्षय सोबत असणारे अनैतिक संबंध याबद्दल समजल्यानंतर सतीश वाघ यांनी अनेक वेळा मोहिनीला मारहाण केली होती.

सतीश वाघ हे सातत्याने मारहाण करत होते. तयसेच आर्थिक व्यवहार देखील त्यांना हातात हवे होते. सोबतच आरोपी अक्षय जा‌वळकर याच्यासोबत गेल्या काही वर्षांपासून असलेल्या अनैतिक संबंधातून अपहरण व खून झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान मोहिनी वाघ यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मोहिनी वाघ हिच्या सांगण्यावर अक्षय याने त्याच्या साथीदार आरोपींना सतीश वाघ यांना माण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिलेली होती. ही घटना पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी आहे अशी माहिती या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी न्यायालयाला दिली.

या गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वी पवन श्यामसुंदर शर्मा, नवनाथ अर्जुन गुरसाळे, विकास ऊर्फ विक्की सीताराम शिंदे आणि अक्षय ऊर्फ सोन्या हरीश जावळकर यांना अटक केली आहे. या आरोपींच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर अतिश जाधव याला ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. रोहिणी, जाधव आणि यापूर्वी अटक करण्यात आलेले आरोपी या सर्वांचा एकत्रित तपास करायचा असल्याने आता सर्वांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Beed News : बांधकाम करताना तोल गेला अन् आक्रीत घडलं, बीडमध्ये २५ वर्षांच्या तरूणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT