Satish Wagh Murder: मामीनंच काढला मामाचा काटा; बॉयफ्रेंडच्या मदतीनंच केला खून, 'असा' रचला कट

Satish Wagh Case: आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येमागे मामीच असल्याचं उघड झालंय. सतीश वाघ यांची हत्या पत्नी मोहिनी वाघ यांनी सुपारी देऊन केला असल्याचा आरोप पोलीस तपासात निष्पन्न झालंय.
Satish Wagh Case
Satish Wagh CaseSaam Tv News
Published On

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येमागे मामी मोहिनी वाघ असल्याचं उघड झालंय. सतीश वाघ यांची हत्या पत्नी मोहिनी वाघ यांनी सुपारी देऊन घडवून आणल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. मुलाच्या मित्रासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून आणि त्याच्याच साथीनं मोहिनी यांनी नवऱ्याचा काटा काढलाय. ९ डिसेंबरला राहत्या घरातून अपहरण करून खून करण्यात आला होता. अनैतिक संबंधातून सतीश यांचा खून झाल्यानंतर पुणे पोलिसांनी मोहिनीला अटक केली आहे.

२३ वर्षांपूर्वी जावळकर दाम्पत्य त्यांचा ९ वर्षांचा मुलगा अक्षय याला घेऊन पुण्यात आले. सतीश यांच्या घरी ते भाडेकरू म्हणून राहत होते. सतीश आणि मोहिनी यांचा मुलगा अक्षयच्या वयाचा असल्यानं दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्री झाल्यामुळे अक्षयचे येणे जाणे सुरू होते. २०१३ साली जेव्हा अक्षय २१ वर्षांचा झाला, तेव्हा मोहिनी ज्यांचे वय ३७ होते, या दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. पण ही गोष्ट फार काही लपून राहिली नाही. सतीश यांना मोहिनी आणि अक्षय यांच्यातील अनैतिक संबंध कळाले.

Satish Wagh Case
Cyber Crime : विदेश गिफ्ट पाठविल्याच्या नावे महिलेची फसणूक; २७ लाख ३८ हजार उकळले

२०१६ साली अक्षयने सिव्हिल इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. तेव्हा त्याच्या आई वडिलांनी त्याचं लग्न लावून देण्याचं ठरवलं. अक्षयचं लग्न झाल्यानंतरही अक्षय आणि मोहिनीचे अफेअर सुरू होते. या कारणामुळे अनेक वर्षे अक्षय, मोहिनी आणि सतीश यांच्यात वाद धुमसत होता. राग अनावर होत असल्यानं सतीश यांनी मोहिनीला मारहाण देखील केली. याच जाचाला कंटाळून मोहिनी यांनी सतीश यांना कायमचं बाजूला करायचं ठरवलं.

सतीश यांना कायमचं बाजूला केल्यानं प्रेमसंबंध चालू राहतील आणि आर्थिक व्यवहार सुद्धा आपल्या ताब्यात येतील असं त्यांना वाटलं. मात्र, गुन्हा हा फार काळ काही लपून राहत नाही. अक्षयला ५ लाख रुपयांची सुपारी देऊन मोहिनी यांनी सतीश यांचा खून करण्याचा प्लॅन रचला. ९ डिसेंबर रोजी सतीश वाघ मॉर्निंग वॉकसाठी गेले होते, अक्षय आणि त्याच्या गँगनं सतीश यांचं आधी अपहरण केलं, नंतर त्यांच्यावर तब्बल ७० वार करत त्यांचा खून केला.

Satish Wagh Case
Satish Wagh Murder : शेजाऱ्याशी जवळीक, पतीचा अडसर, 5 लाखांची सुपारी; सतीश वाघ खून प्रकरणाची A to Z कहाणी

सुरूवातीला सतीश यांचा खून आर्थिक वादातून झाल्याचं दिसून येत होते. मात्र तपासातून अखेर खूनाचा कट उलगडला आणि मोहिनी आणि अक्षय यांचं प्रकरण उघडकीस आलं. याप्रकरणी अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे सांगतात, 'मोहिनी वाघ यांना सतीश वाघ प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात ६ जणांना ताब्यात घेण्यात आला आहे. अक्षय आणि मोहिनी यांनीच सतीश वाघ यांच्या हत्येचा कट रचला होता. या प्रकरणात इतर चौघेही सामिल झाले होते'. असं शैलेश बलकवडे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com