raj thackeray And eknath shinde saam tv
मुंबई/पुणे

KDMC Politics: मोठी बातमी! कल्याण-डोंबिवलीत राजकीय उलथापालथ, मनसेच्या पाठिंब्याने शिंदेसेनेचा महापौर होणार?

KDMC mayor to be from Shinde Sena with MNS support: कल्याण-डोंबिवलीत मोठी राजकीय घडामोड घडली. मनसेचे ५ ही नगरसेवक शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्वजण कोकण भवनमध्ये दाखल झाले आहेत.

Priya More

Summary -

  • केडीएमसीमध्ये सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग

  • मनसेच्या पाठिंब्याने शिंदेसेना महापौर होण्याची शक्यता

  • मनसेचे नगरसेवक नवी मुंबईतील कोकण भवनमध्ये दाखल

  • ठाकरे गटातील काही नगरसेवक फुटल्याची चर्चा

कल्याण-डोंबिवलीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेत सत्ता स्थापनेसाठी नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. या सर्व घडामोडींदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. या महानगर पालिकेत सत्तास्थापनेसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला राज ठाकरें यांच्या मनसेकडून पाठिंबा दिला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मनसेचे नगरसेवक नवी मुंबईतल्या कोकण भवनमध्ये गेले आहेत त्यामुळे आता मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याचे बोलले जात आहे.

कल्याण- डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीमध्ये मनसेचे ५ नगरसेवक निवडून आले आहेत. हे सर्व नगरसेवक गट स्थापन करण्यासाठी नवी मुंबईतल्या कोकण भवनमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी मनसेचे माजी आमदार राजू पाटील हे देखील या नगरसेवकांसोबत आले आहेत. त्यामुळे हे सर्वजण शिवसेना शिंदे गटाला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्यासाठी आले आहेत की गट स्थापन करण्यासाठी आले आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे.कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी ६२ ही मॅजिक फिगर असणे खूप गरेजेचे आहे.

या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे ५३ नगरसेवक निवडून आले. तर भाजपचे ५० नगरसेवक निवडून आले. शिवसेना ठाकरे गटाचे ११ नगरसेवक आणि मनसेचे ५ नगरसेवक विजयी झाले. मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे नगरसेवक फुटल्याची चर्चा सुरू आहे. कारण मंगळवारी शिवसेना ठाकरे गट कोकण विभगीय आयुक्तांकडे आपल्या गटाची स्थापना करण्यासाठी जात असताना ठाकरेंचे काही नगरसेवक गैरहजर होते.

हे नगरसेवक मनसेच्या गोटात गेल्याची चर्चा आहे. आता ठाकरे गटाचे संख्याबळ हे ७ वर आले. तर मनसेचे ५ आणि ठाकरे गटाकडून आलेले २ नगरसेवक हे शिंदेंना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जिल्हा परिषद निवडणूक प्रकरणावर आज सुनावणी झालीच नाही

Skin Care : तुमची त्वचा ड्राय होते? मग ट्राय करा 'या' नॅचरल फेशियल टिप्स

Saree Matching Blouse Designs: साडीवर मॅचिंग ब्लाऊज कसा निवडायचा? हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

Banarasi Saree Blouse Designs : बनारसी साडीवर शिवा 'या' ट्रेंडी डिझाइनचे ब्लाउज, पारंपरिक लूकला मिळेल मॉडर्न ट्विस्ट

Metabolic Syndrome: मेटाबोलिक सिंड्रोम म्‍हणजे काय? शरीरातील थायरॉईड कसा ठेवाल उत्तम? निरोगी शरीरासाठी काय घ्याल काळजी?

SCROLL FOR NEXT