Kalyan Shivsena Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Shivsena News: कल्याणमध्ये ठाकरे गटाला खिंडार! अनेक पदाधिकारी शिंदे गटाच्या गळाला...

Shivsena Latest News: हे सर्व जण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Priya More

Kalyan News: कल्याण -डोंबिवलीमध्ये (Kalyan-Dombivli) ठाकरे गटाला (Thackeray Group) एकापाठोपाठ एक धक्का मिळत आहे. कल्याणमध्ये ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. ठाकरे गटाचे विधानसभा संपर्कप्रमुख रमाकांत देवळेकर (Ramakant Devalekar) यांच्यासह युवा सेनेचे माजी शहर प्रमुख आणि अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आज हे सर्व जण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

दोन दिवसांपूर्वीच उपजिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला होता. त्या पाठोपाठ आता कल्याण पूर्व येथील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने कल्याणमध्ये ठाकरे गटाला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातून कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. कल्याण- डोंबिवली हा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर कल्याणमधील शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्यापाठोपाठ अवघ्या महिनाभरातच कल्याण डोंबिवलीमधील तब्बल 40 हून अधिक नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना समर्थन देत शिवसेनेत प्रवेश केला.

दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला होता. त्या पाठोपाठ आता कल्याण पूर्व येथील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील उद्धव ठाकरे यांचा हात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण पूर्व येथील ठाकरे गटाचे विधानसभा संपर्कप्रमुख रमाकांत देवळेकर हे ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी हे सर्वजण शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रात्री आठ वाजता हा प्रवेश होणार आहे. शिवसेनेचे विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांच्या पुढाकाराने हा प्रवेश होणार आहे. दरम्यान शिवसेनेत फूट पडल्यानंतर रमाकांत देवळेकर हे उद्धव ठाकरे गटासोबत राहिले होते. गेल्या नऊ महिन्यांपासून देवळेकर हे ठाकरे गटासाठी काम करत होते.

रमाकांत देवळेकर हे गेल्या 41 वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहेत. त्यांनी विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. याबाबत रमाकांत देवळेकर यांनी स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या गटबाजीला कंटाळून उद्धव ठाकरे यांना सोडचिट्टी देत असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला लागलेली गळती काही थांबत नसून काही महिन्यांवर होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासमोर मोठं आव्हान उभे ठाकलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT