Sharad Pawar News: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीसोबत राहणार की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही, असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चंना उधाण आलं आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात नानाविविध अंदाज बांधले जात आहे. शरद पवारांच्या गुगलीने अनेक जण संम्रभात पडले आहे. याचदरम्यान, शरद पवार यांनी त्यांच्या महाविकास आघाडीवरील वक्तव्यावरून आता स्पष्टीकरण देत राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम दिला आहे. (Latest Marathi News)
महाविकास आघाडीवर केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना शरद पवार म्हणाले, 'महाविकास आघाडीत जागा वाटप निश्चित नाही, यामुळे भूमिका मांडली पण त्याचा वेगळा अर्थ काढू नका, असे भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली.
'महाविकास आघाडी ऐक्य राहावं ही भूमिका आहे, पण जागा वाटप काहीच चर्चा नाही, याचा संदर्भ देत विधान केल्याचे शरद पवार यांनी केले स्पष्ट केले.
काय म्हणाले होते शरद पवार?
2024 च्या निवडणुका वंचित बहुजन आघाडीसोबत मविआ एकत्र लढेल का? या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी म्हटलं होतं की, 'वंचितची आघाडीसोबत चर्चा झालेली नाही. जी चर्चा झाली ती फक्त कर्नाटकातल्या मर्यादीत जागांविषयी होती. दुसरी कसलीही नव्हती, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
तसेच,मविआबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, "आमची एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण इच्छा पुरेशी नसते. जागांचं वाटप, त्यामध्ये काही इश्यू आहेत. त्यामुळे हे अजून ठरलेलं नाही तर पुढचं कसं सांगता येईल. महाविकास आघाडी एकत्र लढणार का नाही हे आत्ताच कसं सांगू? असं विधान शरद पवार यांनी केलं होतं.
काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार अमरावतीमध्ये बोलताना 'आमची एकत्र राहण्याची इच्छा आहे. मात्र, आत्ताच निश्चित सांगता येत नाही, या वक्तव्यावर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'शरद पवार जे बोलले त्याचा विपर्यास करू नये. ते म्हणाले निवडणुकीला अजून वेळ आहे, आमची वज्रमूठ सभा सगळीकडे यशस्वी होत आहे. महाविकास आघाडी एकजूट आहे आणि एकजूट राहील, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे .
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.