Sanjay Raut on Sharad Pawar: 3 पक्षांनी एकत्र राहवं ही पवारांचीच भूमिका; शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया

Maharashtra Politics: महाविकास आघाडीच्या उभारणीत पवारांचा मोठा वाटा आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र राहवं ही शरद पवारांची इच्छा आहे.
Sanjay Raut on Sharad Pawar
Sanjay Raut on Sharad PawarSaam tv
Published On

Political News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका वक्तव्याने सध्या राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवारांनी अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलताना आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीसोबत राहणार की नाही हे अताच सांगता येणार नाही, असे विधान केले. त्यांच्या या सूचक विधानामुळे आघाडीच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या मुद्द्यावरून अनेक निष्कर्ष काढले जात असताना त्यावर आता संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

Sanjay Raut on Sharad Pawar
Shiv sena: खळबळजनक! पक्ष संपवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची NCP ला सुपारी; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

"शरद पवारांना (Sharad Pawar) जे काही बोलायच आहे ते समजून घ्या. त्यांच्या बोलण्याचा नेहमीच वेगळा अर्थ काढला जातो. या क्षणी महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे. आम्ही एकत्र आहोत हे सांगण्याासठी आम्ही १ मे रोजी मुंबईत मविआची (Mahavikas Aghadi) ऐतिहासिक सभा घेणार आहोत. त्या सभेला तिन्ही पक्ष एकत्र येऊन तिन्ही पक्षाचे वरीष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत असं संजय राऊत म्हणाले.

"महाविकास आघाडीच्या उभारणीत पवारांचा मोठा वाटा आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र राहवं ही शरद पवारांची इच्छा आहे. तिघं एकत्र राहिलो, तर २०२४ साली आपण भाजपाचा पराभव करू, लोकसभाही मोठ्या संख्येनं जिंकू अशी शरद पवारांची भूमिका आहेत. मला अजिबात असं वाटत नाही की महा विकास आघाडीसंदर्भात त्यांची अशी काही भूमिका असेल. आम्ही सगळेच सातत्याने त्यांच्याशी चर्चा करत असतो. आत्ताच थोड्या वेळापूर्वी माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांच्या बोलण्यावरून मविआ तुटावी असं मला कधी वाटलं नाही. अस राऊत म्हणाले. (Political News)

Sanjay Raut on Sharad Pawar
Viral Video: अपघात झाला की कार थेट आकाशातून पडली, विचित्र अपघात पाहून नेटकरीही चक्रावले

काय म्हणाले शरद पवार?

2024 च्या निवडणुका वंचित बहुजन आघाडीसोबत मविआ एकत्र लढेल का? या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी म्हटलं की, "वंचितची आघाडीसोबत चर्चा झालेली नाही. जी चर्चा झाली ती फक्त कर्नाटकातल्या मर्यातीद जागांविषयी होती. दुसरी कसलीही नव्हाती, मविआ आणि वंचित बाबात शदर पवारांनी असं म्हटलं आहे.

तसेच,मविआबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, "आम्ही एकत्र लढणार वगैरे आघाडी आहे. एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण इच्छा पुरेशी नसते. जागांचं वाटप, त्यामध्ये काही इश्यू आहेत. त्यामुळे हे अजून ठरलेलं नाही तर पुढचं कसं सांगता येईल. मविआ एकत्र लढण्याबाबत आत्ताच कसं सांगू? असं विधान शरद पवार यांनी केलं आहे."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com