Shiv sena: खळबळजनक! पक्ष संपवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची NCP ला सुपारी; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

Shiv sena : ठाकरे गट जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत खळबळजनक आरोप केले आहेत.
Shiv Sena
Shiv SenaSaam TV

Political News : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सुपारी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठाकरे गट जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत खळबळजनक आरोप केले आहेत. (Shiv sena)

सध्या फक्त पदाचा राजीनामा दिला असून कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेतले जातील असं, महेश पासलकर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीकडून शिवसेना संपवली जात आहे, असा आरोप वारंवार केला जात आहे. अशात ठाकरे गटाच्याच जिल्हा प्रमुखाने असे आरोप करत राजीनामा दिल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

Shiv Sena
Mumbai Crime: पोलीस काहीच करू शकणार नाही म्हणत तरुणाला तलवार, हॉकी स्टिकने बेदम मारहाण

तक्रारींकडे दुर्लक्ष

पासलकर यांनी राजीनामा देत म्हटलं की, दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतत दुजाभावाची वागणूक मिळत होती. त्यामुळे ही गोष्टी त्यांनी शिवसेनेच्या वरिष्ठांच्या कानावर घातली मात्र त्यांच्या तक्रारीकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केलं.

दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतत दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याची बाब पासलकर यांनी शिवसेनेच्या वरिष्ठांच्या कानावर घातली परंतू त्यांनी त्यास महत्व दिले नाही. याउलट पासलकर यांचा विरोध असताना खासदार संजय राऊत यांची दौंड तालुक्यात जाहीर सभा होत आहे.

Shiv Sena
Pune Crime News : "ब्लू बेल्स" शाळेच्या इमारतीत घडत होत्या नको त्या घटना; संतापजनक कृत्यांमुळे शाळेची मान्यत रद्द

संजय राऊतांनी मला तोंडावर पाडले

शिवसेनेत आपल्याला डावलले जात आहे. दौंडमध्ये माझी सभा होणार नाही, असे राऊत यांनी मला सांगितले होते. माझ्याऐवजी माजी आमदार रमेश थोरात यांची सभा होणार असं राऊत म्हणाले. मात्र आता माझा विरोध असतानाही राऊतांची दौंड येथे सभा होत आहे. या सभेबाबत राऊतांनी मला तोंडावर पाडले आहे, अशी खंत पासलकर यांनी व्यक्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com