Delhi Viral News: काय सांगता! चक्क रस्त्यांवर घोडागाड्यांच्या शर्यतीचा थरार, ४ घोडे जप्त; पाहा VIDEO

Delhi Viral Video: रस्त्यात घोडागाडींची वर्दळ झाल्याने इतर प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.
 Viral Video
Viral VideoSaamtv
Published On

Horse Race On Road Delhi News: रविवारी संध्याकाळी दिल्लीच्या (Delhi) रस्त्यावर घोडा गाड्यांची शर्यत पाहायला मिळाली. ज्यामुळे सर्वच आश्चर्य चकित झाले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कारवाई करत १० जणांना अटक केली आहे. दिल्लीतील दर्या गंजजवळ जवाहरलाल नेहरू मार्गावर हा प्रकार घडला. भररस्त्यात घोडागाडींची वर्दळ झाल्याने इतर प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओही (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 Viral Video
Beed News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; दिवंगत शिवसैनिक सुमंत रुईकरांच्या कुटुंबियांना मिळालं हक्काचं घर

याबाबत अधिक माहिती अशी की, माहिती मिळताच पोलिसांनी टांगा शर्यत सुरू असलेल्या लोकांना अडवून ताब्यात घेतले. मध्य दिल्ली येथून दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना अशी माहिती मिळाली काही लोक दिल्लीच्या रस्त्यावर घोडा गाड्यांची शर्यत करत लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

ही टांगा शर्यत जवाहरलाल नेहरू मार्गे राजघाट ओलांडून पहाडगंजकडे जात असल्याचे पोलिसांना समजले. याबाबतची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत कमला मार्केट परिसरात बॅरिकेड केले.

 Viral Video
Sharad Pawar News: 'वेगळा अर्थ काढू नका'; महाविकास आघाडीवर केलेल्या वक्तव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण

पोलिसांच्या या कारवामध्ये चार घोडागाड्या आणि त्यांच्या सहा चालकांना अटक केली आहे. तसंच, घोडागाडीची शर्यत व्यवस्थित व्हावी यासाठी रस्ता मोकळा करण्याकरता चार स्कुटीचालकही रस्त्यावर उतरले होते. या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने रस्त्यांवर वर्दळ असते.

त्यामुळे ऐन गर्दीच्या दिवशी चार घोडागाड्या शिरल्याने वाहनातील प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. याप्रकरणात पोलिसांनी कलम २८९,२६८,१८८,३४ आयपीसी सह कलम ११ अन्वये कारवाई केली आहे. तसंच, घोडेही जप्त करण्यात आले असून ते एमसीडीकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com