aditya thackeray and eknath shinde Saam TV
मुंबई/पुणे

Aditya Thackeray News: मुंबई महापालिकेत 6000 कोटींचा घोटाळा; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

Aaditya Thackeray Press Conference : मुंबईच्या रस्त्यांसाठी 5 हजार कोटींचे टेंडर काढण्यात आले पण प्रतिसाद आला नाही. शेवटी ते रद्द केले.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील रस्त्यांच्या कामासाठीच्या टेंडरमध्ये सहा हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

स्वत:ला खोके आणि राज्याला धोके असंच हे सरकार पुढे जात आहे. मुंबई पालिकेची लूट खोके सरकारनं सुरू केली आहे. मुंबईच्या रस्त्यांसाठी 5 हजार कोटींचे टेंडर काढण्यात आले पण प्रतिसाद आला नाही. शेवटी ते रद्द केले.

पूर्वी जो रस्ता 10 कोटीत बनायचा तो आता 17 ते 18 कोटीत बनत आहे. तुम्ही स्वत:ला विकलं आहे, माझ्या मुंबईला विकू नका. मुंबईच एटीएम करू नका. हा घोटाळा आता जनतेच्या नजरेत आला आहे, त्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याची गरज आहे., असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुंबईच्या रस्त्यांसाठी आधी 5 हजार कोटींचे टेंडर काढण्यात आले पण प्रतिसाद आला नाही. त्यानंतर नवं टेंडर काढण्यात आलं. त्यात प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला सरासरी 48 टक्के गेन झाला आहे. जनरल बॉडी कमिटी नाही, महापौर नाहीत, स्टॅन्डिंग कमिटी नाही. मग प्रशासकांना अशा प्रकारे शेड्युल ऑफ रेट बदलणे ई. अधिकार कोणी दिले?? ते कोणाकडून आदेश घेत आहेत? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.

मुंबईत सिमेंट-कॉन्क्रिटचे रस्ते बनवण्यात येणार आहेत. मग एवढी वर्ष ते ठाण्याचे पालकमंत्री होते, नगरविकास खातं त्यांच्याकडे होतं मग इतकी वर्ष ठाण्यातील रस्ते सिमेंट कॉन्क्रिटचे का केले नाहीत? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

मुंबई महापालिकेत 1996-97 मध्ये शिवसेना सत्तेत आली तेव्हा पालिकेचं बजेट तोट्यात होती. आपण पैसा वाचवून एफडी बनवली. पालिका देशाच्या नजरेत आली परंतु जर अशा प्रकारे काम करत राहिले तर माझा अंदाज आहे की एफडी मोडावी लागेल. 25 वर्ष काम करुन पैसा नीट वापरुन आम्ही सोयीसुविधा दिल्या, पैसे वाचवले. पण आता फक्त पैशांची उधळपट्टी सुरू आहे, असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

SCROLL FOR NEXT