Housing Society Maintenance Saam
मुंबई/पुणे

Housing Society : मोठी बातमी! सोसायट्यांना आता 'NA' टॅक्स भरावा लागणार नाही; थकबाकीही माफ, राज्य सरकारचा निर्णय

NA tax Maharashtra Latest Update : राज्य सरकारने शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांवरील वार्षिक अकृषिक (एनए) कर पूर्णपणे रद्द केला आहे. जुनी व नवी बांधकामे यावर हा कर आकारला जाणार नाही तसेच थकबाकीदेखील माफ करण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

housing society tax rules Maharashtra, property conversion tax : राज्यातील शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांवर आकारला जाणारा अकृषिक (एनए) कर रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापुढे जुन्या किंवा नव्या कोणत्याही बांधकामांवर हा कर आकारला जाणार नाही. तसेच पूर्वीची थकबाकीदेखील शासनाने माफ केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत याबाबतची घोषणा केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात आमदार भीमराव तापकीर यांनी शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांसाठी अकृषिक कर माफ करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी हा निर्णय स्पष्ट केला.

तापकीर यांचा प्रश्न ?

शहरी भागातील बांधकामांवरील जागांवर अकृषिक कर आकारला जात होता. १० मार्च २०२६ रोजी शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार हा कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयापूर्वी झालेल्या बांधकामांवर आकारलेला कर रद्द केला जाणार का? तसेच भविष्यात बांधकाम परवानगी देताना हा कर बांधकाम व्यावसायिकांकडून एकरकमी वसूल केला जाणार का? असे दोन प्रश्न तापकीर यांनी उपस्थित केले.

बावनकुळेंनी काय दिले उत्तर?

राज्य सरकारने वार्षिक अकृषिक कर पूर्णपणे रद्द केला आहे. त्यामुळे जुनी किंवा नवी अशी कोणतीही बांधकामे असतील. त्यांच्यावर आता एनए कर आकारला जाणार नाही. यापूर्वी आकारलेला कर तसेच थकबाकी देखील शासनाने माफ केली आहे. त्यामुळे राज्यातील गृहनिर्माण संस्था आणि फ्लॅटधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच रूपांतरण करासंदर्भात शासनाने सुलभ पद्धत लागू केली असल्याचेही सांगितले. त्यानुसार २००१ पूर्वी झालेल्या बांधकामांसाठी २००१ च्या रेडी रेकनर दराच्या ०.१० टक्के इतका दर निश्चित करण्यात आला आहे. हा दर एक हजार चौरस मीटर क्षेत्रफळासाठी लागू राहील, असे बावनकुळे म्हणाले.

याशिवाय मोठ्या क्षेत्रफळाच्या विकासासाठी एकरकमी रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चार हजार चौरस मीटरपर्यंतच्या क्षेत्रासाठी ०.२५ टक्के तर त्यापेक्षा जास्त म्हणजे एक एकराहून अधिक क्षेत्रासाठी ०.१५ टक्के इतका दर आकारून एकदाच रक्कम भरल्यास संबंधितांना पुढील करातून सूट मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

या नव्या प्रणालीमुळे नागरिकांना वारंवार महसूल कार्यालयात जावे लागणार नाही. तसेच करप्रणाली अधिक सुलभ होणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. या निर्णयामुळे गृहनिर्माण संस्थांवरील आर्थिक भार कमी होणार असून शहरी भागातील हजारो फ्लॅटधारकांना दिलासा मिळणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांसाठी अकृषिक कराच्या प्रश्नावर पूर्णविराम मिळाला आहे. नागरिकांना कर, दंड किंवा व्याजाचा कोणताही अतिरिक्त भार सहन करावा लागणार नसल्याचेही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक- संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

Parbhani Firing: जुना वाद पुन्हा उफाळला; प्राध्यापक मुंडेंच्या घरावर बेछूट गोळीबार,परिसरात खळबळ

Weight Loss : वजन कमी करणाऱ्यांसाठी पोहे वरदान, फक्त टाका 'हे' २ पदार्थ

MS Dhoni Injury Update : चेन्नई सुपर किंग्ज संकटात असतानाच महेंद्रसिंग धोनी घेणार मोठा निर्णय

Mumbai High Court: ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्याच्या स्तनांकडे एकटक बघणे गुन्हा नाही, मुंबई हायकोर्टाने काय दिला निकाल?

SCROLL FOR NEXT