CIDCO Home Lottery 2026 Saam Tv
मुंबई/पुणे

CIDCO Lottery: नवी मुंबईत घ्या हक्काचं घर! सिडकोच्या १६,८७६ घरांची लॉटरी, पसंतीचे घर निवडीसाठी मुदतवाढ

CIDCO Home Lottery 2026: नवी मुंबईमध्ये हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सिडकोच्या १६,८७६ घरांची लॉटरी निघाली आहे. तुमच्या पसंतीचे घर निवडीसाठी सिडकोने मुदतवाढ दिली आहे.

Priya More

Summary -

  • सिडकोच्या १६,८७६ घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ देण्यात आली

  • नागरिकांना १९ मार्च २०२६ पर्यंत पसंतीचे घर निवडता येणार आहे

  • नवी मुंबईतील स्टेशनजवळ आणि प्राइम लोकेशनवर ही घरे उपलब्ध असणार आहेत

  • नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो कनेक्टिव्हिटीमुळे या घरांना मोठी मागणी

नवी मुंबईमध्ये हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. सिडकोच्या १६,८७६ घरांची लॉटरी निघणार आहे. या लॉटरीसाठी आता मुदतवाढ देण्यात आल्यामुळे घर घेणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सिडकोच्या 'माझे पसंतीचे सिडकोचे घर - माझा फर्स्ट चॉइस नवी मुंबईमध्ये' या योडनेमध्ये पर्याय निवडीसाठी २० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. तुम्ही १९ मार्च २०२६ पर्यंत तुमच्या पसंतीचे घर निवडू शकता.

'माझे पसंतीचे सिडकोचे घर – माझा फर्स्ट चॉइस नवी मुंबईमध्ये” या योजनेंतर्गत नवी मुंबईतील प्राइम लोकेशनवर आणि अगदी स्टेशनजवळ घरं आहेत. वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली या नोडमध्ये असणाऱ्या १६,८७६ घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी ही घरं उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या सान्निध्यात उभारण्यात येत असलेल्या या गृहसंकुलांना रेल्वे, महामार्ग आणि मेट्रोद्वारे उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी लाभली आहे. महत्वाचे म्हणजे या लॉटरीमध्ये ज्यांना घरं मिळणार आहेत त्या नागरिकांना सोयीस्कर आणि सक्षम शहरी जीवनशैलीची संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेत अनामत रक्कमेचा भरणा करण्यासाठीची अंतिम तारीख १५ मार्च २०२६ असणार आहे. तर आपले पसंतीच्या घराचा पर्याय निवडण्यासाठीची अंतिम तारीख १९ मार्च २०२६ आहे.

सिडकोच्या घरांच्या या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिकांनी www.cidcohomes.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. या योजनेसंदर्भातील सर्व अधिकृत आणि अद्ययावत माहिती सिडकोतर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या पत्रकांद्वारे तसेच सिडकोच्या अधिकृत समाजमाध्यमांवरून वेळोवेळी प्रसारित केली जाते. त्यामुळे नागरिकांनी या योजनेसंदर्भात इतरत्र उपलब्ध होणाऱ्या अप्रमाणित माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे. सिडकोने मुदतवाढ केल्यामुळे घर घेणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT