Uddhav-Raj Thackeray Alliance saam tv
मुंबई/पुणे

MNS-Shivsena Alliance: मोठी बातमी! मनसे-शिवसेना युतीची घोषणा उद्या, महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र

Uddhav-Raj Thackeray Alliance: महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मनसे-शिवसेना युतीची अधिकृत घोषणा उद्या केली जाणार आहे. ठाकरे बंधू वरळी डोममध्ये पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा करतील.

Priya More

Summary -

  • महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र

  • मनसे–ठाकरेसेना युतीची उद्या अधिकृत घोषणा होणार

  • वरळीच्या एनएससीआय डोममध्ये भव्य पत्रकार परिषद घेतल जाईल

  • जागावाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मनसे- शिवसेना युतीची घोषणा उद्या होणार आहे. ठाकरे बंधू उद्या युतीबाबबत अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जागावाटपावर असलेला गोंधळ देखील दूर झाला असून उमेदवारांची नावं देखील आज ठरवली जातील. युतीच्या घोषणेनंतर उमेदवारांची नावं जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महापालिका निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. उद्या मनसे- शिवसेना युतीची घोषणा होणार आहे. भव्य पत्रकार परिषद घेत ठाकरे बंधू युतीबाबतची मोठी घोषणा करतील. वरळीतील एनएससीआय डोममध्ये यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. ठाकरे बंधू या पत्रकार परिषदेमध्येच युतीबाबत मोठी घोषणा करतील असे सांगितले जात आहे.

मनसे आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपाचा तिढा देखील आज सुटणार आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आज प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी देखील मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेतला जाईल. उद्या युतीच्या घोषणेवेळी कोण किती जागा लढवणार हे देखील जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. युतीच्या घोषणेची उत्सुकता सर्वांना होती अखेर तो दिवस आला आहे.

२३ पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. त्याच दिवशी मनसे-शिवसेना युतीची घोषणा होईल. सर्व महानगरपालिकांबाबतची युतीची घोषणा उद्या होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि शिवसेना पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते युतीच्या घोषणेची वाट पाहत होते. आता उद्या युतीची घोषणा करण्यात येणार असल्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केल्याचा राग, बापाकडून गर्भवती मुलीची हत्या; नवरा अन् सासू-सासऱ्यांनाही सोडलं नाही

हा एक प्रीतीसंगम... वाजत-गाजत युतीची घोषणा होणार, संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या राजकीय मनोमिलनाची तारीखच सांगितली|VIDEO

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफा बाजारपेठेत सोने-चांदीचे दर वाढले

Blouse Designs: प्रत्येक साडीवर शोभून दिसतील ब्लाऊजच्या गळ्याचे हे 5 डिझाईन्स; एकदा शिवून तर बघा

Home Decoration Ideas : या ६ प्रकारे सजवा तुमच्या स्वप्नातील नवीन घर, अधिक सुंदर दिसेल

SCROLL FOR NEXT