MNS News
MNS NewsSaam TV

MNS News: मनसेने भाकरी फिरवली; कल्याण शहर अध्यक्षपदी माजी आमदार प्रकाश भोईर यांची वर्णी

Political News: काही दिवसांपूर्वीच मनसेने डोंबिवली शहर अध्यक्ष पदी राहुल कामत यांची निवड केली होती. त्या पाठोपाठ आता कल्याण शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
Published on

अभिजित देशमुख

Kalyan

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्यात. अशात आज कल्याण शहर अध्यक्ष पदी माजी आमदार प्रकाश भोईर यांची निवड करण्यात आली आहे.

MNS News
MNS : खारघरमध्ये माथाडी कार्यकर्त्यांकडून मनसैनिकांना मारहाण; कामोठ्यात MNSकार्यकर्त्यांनी फोडलं महेश जाधवांचं कार्यालय

कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेने संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेने डोंबिवली शहर अध्यक्ष पदी राहुल कामत यांची निवड केली होती. त्या पाठोपाठ आता कल्याण शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी निवडणुका पाहता कल्याण शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्या जागी आता माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. येणाऱ्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कल्याण लोकसभा मतदारसंघात मनसेने भाकरी फिरवली असल्याचे बोलले जात आहे.

प्रकाश भोईर हे भारतीय विद्यार्थी सेनेपासून राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मनसे पक्ष स्थापनेपासून भोईर राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत प्रकाश भोईर मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतरच्या 2014 व 2019 विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. याच दरम्यान त्यांच्याकडे प्रदेश सरचिटणीस ही जबाबदारी होती.

MNS News
मराठा - ओबीसी वादासंदर्भात Raj Thackeray यांनी केलेल्या दाव्याला जरांगेंचं प्रत्युत्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com