Big news Uddhav Thackeray group will get Shivaji Park ground for Dasara Melava Eknath Shinde  Saam TV
मुंबई/पुणे

Dasara Melava: शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचाच आवाज घुमणार; शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत आली मोठी अपडेट

Satish Daud

Shiv Sena Dasara Melava News

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यंदा शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचाच आवाज घुमणार आहे. शिंदे गटाने मैदानासंदर्भात महापालिकेकडे केलेला अर्ज आता मागे घेतला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडत आहे. (Latest Marathi News)

गेल्यावर्षी जून महिन्यात शिवसेनेत दोन गट पडले. त्यामुळे दोन्ही गटाकडून दसरा मेळावा घेण्यासाठी मैदानावर वारंवार दावे करण्यात येत होते. मात्र, त्यानंतर प्रकरण कोर्टात गेले होते. त्यावेळी कोर्टाने यावर सुनावणी देताना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याला ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) परवानगी दिली होती.

दरम्यान, यंदाही दसरा मेळाव्यासाठी आपल्यालाच मैदान मिळावं म्हणून ठाकरे आणि शिंदे गटाने (Eknath Shinde) मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल केले होते. शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच मिळणार, असा दावा दोन्ही गटांकडून करण्यात येत होता. त्यामुळे शिवाजी पार्कवर यंदा कोणाचा दसरा मेळावा पार पडणार, असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता हा पेच सुटला आहे.

शिवाजी पार्कवर (Shivaji Park) आपलाच दसरा मेळावा होणार कार्यकर्त्यांना कामाला लागावे, अशा सूचनाही उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांना आपण त्यांना कधीच रोखलेल नाही. आपला मेळावा (शिंदे गटाचा) क्रॉस किंवा ऑव्हल मैदानावर होणार असल्याचं शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.

आम्हाला उद्धव ठाकरेंसोबत भांडायचे नाही. त्यांना फक्त सहानुभूतीचे राजकारण करायचे आहे, अशी टीकाही केसरकर यांनी केली. दसरा मेळाव्यासाठी आम्ही महापालिकेकडे केलेला अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती देखील दीपक केसरकर यांनी साम टीव्हीसोबत बोलताना दिली. त्यामुळे दसरा मेळाव्याला यंदा शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचाच आवाज घुमणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT