MNS Toll Plaza Protest: मोठी बातमी! मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह १२ मनसैनिकांना जामीन मंजूर

Avinash Jadhav Bail Granted: मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह ११ मनसैनिकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Avinash Jadhav Bail Granted
Avinash Jadhav Bail GrantedSaam TV
Published On

Bail Granted to Avinash Jadhav

मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह १२ मनसैनिकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुलंड टोलनाक्यावर प्रतिकात्मक आंदोलन केल्याप्रकरणी नवघर पोलिसांनी अविनाश जाधव यांच्यासह काही मनसैनिकांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक देखील केली होती. मात्र, सोमवारी रात्री उशीरा अविनाश जाधव यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Avinash Jadhav Bail Granted
Mumbai Pune Traveling: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज दोन तासांचा विशेष ब्लॉक; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

दुसरीकडे, मुलुंड टोल नाका पेटविणाऱ्या रोशन वाडकर या मनसे पदाधिकाऱ्याला आयपीसी कलम ४३६ आणि डेमेज पब्लिक प्रॉपर्टी ऍक्ट कलम ३,४ कलमांतर्गत अटक झाली आहे. दरम्यान, जामीनावर बाहेर येताच अविनाश जाधव यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

"आम्हाला अटक केल्यापेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी जो व्हिडीओ दिला होता, जी स्टेटमेंट दिली होती. त्याचं पालन जर महाराष्ट्र पोलिसांनी केलं असतं, तर आम्हाला अटकच करावी लागली नसती", असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना अविनाश जाधव म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं, की महाराष्ट्रातील सर्व टोलकानाक्यावरुन चारचाकी आणि इतर हलक्या वाहनांकडून कुठलाही टोल वसुल केला जाणार नाही. तर आम्ही काय चुकीचं केलं? देवेंद्र फडणवीस जे बोलले तेच आम्ही करत होतो, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपासून मुंबई तसेच महाराष्ट्रातील टोलनाक्यावर टोल दरवाढी करण्यात आली. या दरवाढीविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. सोमवारी सकाळी राज ठाकरे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत काही विधाने केली. त्यानंतर टोलनाक्यांवर दुचाकी व चारचाकी वाहने विनाटोल सोडून देण्याची मागणी करत मनसैनिकांनी अनेक टोलनाक्यांवर ठाण मांडले.

याच दरम्यान, प्रतिकात्मक आंदोलन करण्यासाठी मुलुंड टोल नाक्यावर आलेल्या मनसेचे अविनाश जाधव यांच्यासह काही पदाधिकार्‍यांना दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अटकेनंतर काही मनसैनिकांनी टोल नाका पेटवून देण्याचा प्रयत्न केला. ठाण्याकडे जाणाऱ्या टोल नाक्याच्या केबिनमध्ये पेट्रोल आणि टायर पेटवून टाकण्यात आले. यामुळे केबिन आणि त्यातील साहित्य जळून खाक झाले.

Avinash Jadhav Bail Granted
Rashi Bhavishya: सूर्याच्या चित्रा नक्षत्रप्रवेशाने तयार झाला खास योग; या राशींचे उजळणार भाग्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com