तुम्ही जर मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण, मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक आज म्हणजेच मंगळवारी दोन तासांसाठी बंद असणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दुपारी १२ ते २ यादरम्यान विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. आयटीएमएस प्रणालीच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. एमएसआरडीसीने याबाबतची माहिती दिली आहे. (Latest Marathi News)
एमएसआरडीसीने दिलेल्या माहितीनुसार, अमृतांजन पुलाच्या अलीकडे अन् पलीकडे म्हणजे किलोमीटर ४५ आणि ४५.८०० किलोमीटरवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाणार आहे. या कामावेळी पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक खालापूर टोल नाक्यावर थांबवली जाणार आहे. त्याचबरोबर हलकी वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळवण्यात येणार आहे.
एकीकडे मुंबईहून पुण्याला (Mumbai To Pune) जाणारी वाहतूक २ तासांसाठी बंद असली, तरी पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरू असणार आहे. फक्त कार साठी जुना पुणे - मुंबई महामार्ग शिंग्रोबा घाटातील सुरू राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्याला देशाच्या आर्थिक राजधानीसोबत जोडता यावं म्हणून मुंबई-पुणे एक्सप्रेस वे तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावरुन दिवसभरातून लाखो वाहने ये-जा करत असतात. या मार्गावरून मुंबईला कमी वेळेत जात येत असल्याने सर्वजण. या मार्गाचा वापर केला जातो.
त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवला विशेष महत्व आहे. अशातच एक्सप्रेस वेवर दोन तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार असल्याने वाहनचालकांची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील ३१ ऑगस्ट रोजी महामार्गावर अशाच प्रकारचा विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, त्यावेळी दोन तासांचे काम अवघ्या ४५ मिनिटात उकरण्यात आलं होतं.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.