Raj Thackeray On Toll
Raj Thackeray On TollSaam TV

Raj Thackeray News: 'राज ठाकरेंना अटक करा', सदावर्ते यांची पोलिसात तक्रार

Gunaratna Sadavarte On Raj Thackeray: 'राज ठाकरेंना अटक करा', सदावर्ते यांची पोलिसात तक्रार
Published on

>> गिरीश कांबळे

Gunaratna Sadavarte On Raj Thackeray:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांची शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात केली आहे. 'टोल नाका जाळण्याची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंना तातडीने अटक करा' अशी लेखी तक्रार त्यांनी केली आहे.

तसंच मुलुंड टोल नाका जाळल्या प्रकरणी देखील राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली आहे.

Raj Thackeray On Toll
Maharashtra Politics: 'लायकी' शब्दावरून राज्यातलं राजकारण तापलं; राऊतांनी फडणवीसांवर केली टीका, तर भाजपने दिलं प्रत्युत्तर

याबाबत माध्यमांशी बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, ''हिंदूराष्ट्र भारत हमारा असं मानणारं आमचं संघटन आहे. मराठी गुजराती तमिळ तेलुगू सगळ्यांसाठी महाराष्ट्र, मुंबई एकत्र नांदण्यासाठी आहे. पोलोचे खेळाडू कधीतरी बाहेर येऊन बोलतात.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''महाराष्ट्रात अशी हिंसा आणि राज ठाकरेंची दादागिरी चालवून घेणार नाही डंके की चोट पे सांगत आहोत की, काही झालं तर राज ठाकरेच जबाबदार आहेत.''

Raj Thackeray On Toll
Mulund Tollnaka News: मनसेचं टोलनाक्यांवर आंदोलन, अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यानी आज पत्रकार परिषद घेऊन, टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. टोल घेतल्यास सगळे टोलनाके आम्ही जाळून टाकू, असा इशारा होता. यानंतर राज्य अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्यांवर आंदोलन केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com