MPSC Exam Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! MPSC संयुक्त परीक्षेचे हॉल तिकीट हॅक, विद्यार्थ्यांची माहिती Telegram वर अपलोड

Latest News: एका टेलिग्राम चॅनेलवर हॉल तिकीट अपलोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Prachee kulkarni

Pune News: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त परीक्षा (MPSC Exam 2023) देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र अर्थात हॉल तिकीट (Hall Ticket) हॅक झाले आहे. अनेक विद्यार्थ्यांची माहिती हॅक झाली आहे. एका टेलिग्राम चॅनेलवर हॉल तिकीट अपलोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

त्यासोबतच, एमपीएससी परीक्षेचा पेपर देखील लीक झाल्याचा दावा विद्यार्थी आणि काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. याशिवाय आमदार सत्यजित तांबे यांनी यासंदर्भात ट्वीट करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 30 एप्रिल रोजी एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. एका आठवड्यावर ही परीक्षा आली असताना विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला. एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट 'ब', 'क'च्या परीक्षाचे हॉल तिकीट हॅक (Hall Ticket Hack) करण्यात आले आहे. लाखो विध्यार्थ्यांची माहिती हॅक झाल्याची माहिती मिळत आहे. जवळपास 90 हजारांपेक्षा जास्त विध्यार्थ्यांचे हॉल तिकीट हॅक झाले आहेत. एका टेलिग्राम चॅनलवर या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट अपलोड करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

हॉल तिकीट हॅक झाल्याची माहिती कळताच एमपीएससी परीक्षा देणारे विद्यार्थी आणि नेटकरी संतप्त झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे विद्यार्थी आपला संपात व्यक्त करत आहेत. ते शिंदे-फडणवीस सरकारलाच याबाबत सवाल विचारत आहेत. सरकार काय झोपा काढतंय का?, असा सवाल विद्यार्थी करत आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी देखील विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी यासंदर्भात ट्वीट करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की, 'ही एक अतिशय गंभीर बाब आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटण्याची आणि इतर फेरफाराची प्रकरणे आपण वारंवार पाहतोय. सरकार कोणाचेही असले तरी परिस्थिती बदलत नाही. याचा अर्थ असा होतो की या चुकांना नोकरशाही जबाबदार आहे आणि सत्ताधारी पक्षांनी त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

SCROLL FOR NEXT