Swami Avimukteshwaranand  Saam Tv
मुंबई/पुणे

Gold Scam in Kedarnath: केदारनाथ धाममध्ये २२८ किलो सोन्याचा घोटाळा, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा मोठा आरोप

Kedarnath Temple : केदारनाथ मंदिरात सोन्याचा घोटाळा झाल्याचा आरोप स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केला आहे.

Satish Kengar

ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केदारनाथ धाममध्ये २२८ किलो सोन्याचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. सोमवारी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्री येथे आले होते. ठाकरे यांची भेट घेल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

पत्रकारांनी त्यांना विचारलं होतं की, ''दिल्लीत केदारनाथ धामसारखे मंदिर बांधण्याची चर्चा आहे. यावर तुमचे काय मत आहे? यावर उत्तर देताना शंकराचार्य म्हणाले की, बारा ज्योतिर्लिंगांची व्याख्या आणि नियम आहेत. त्यामुळे केदारनाथ धाम कुठेही बांधता येणार नाही.''

शंकराचार्य म्हणाले, ''शास्त्रात बारा ज्योतिर्लिंगांचा उल्लेख आहे. केदारनाथ धाम दिल्लीत बनणार, हे म्हणणे चुकीचे आहे. आमच्या धार्मिक स्थळी राजकारणी घुसत आहेत. हे चुकीचे आहे. केदारनाथ धाममधून २२८ किलो सोन्याचा घोटाळा झाला आहे. याची चौकशी का होत नाही?''

शंकराचार्य म्हणाले की, 'केदारनाथमध्ये सोन्याचा घोटाळा झाला होता. हा मुद्दा का उपस्थित केला जात नाही? तिथल्या घोटाळ्यानंतर आता दिल्लीत केदारनाथ बांधणार? आता आणखी एक घोटाळा होणार आहे.' दरम्यान, गेल्या वर्षी केदारनाथ धामच्या एका पुजाऱ्याने १२५ कोटी रुपयांचा सोन्याचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. हे सोने मंदिरात वापरण्यात येणार होते, मात्र त्याऐवजी पितळेचा वापर करण्यात आला होता, असा त्यांनी आरोप केला होता.

मात्र हे आरोप मंदिर समितीने फेटाळून लावले होते. आज पुन्हा शंकराचार्यांनी त्याच आरोपाची पुनरावृत्ती केली आहे. ते म्हणाले, ''केदारनाथमधून २२८ किलो सोने गायब आहे. चौकशी झाली नाही. त्याला जबाबदार कोण. आता ते दिल्लीतही केदारनाथ बांधणार असल्याचे सांगत आहेत.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक

Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? १२ खाती अन् इच्छुकांची यादी मोठी

Fact Check: काळ्या बुरशीचा कांदा खाल, जीवानं जाल? बुरशीयुक्त कांद्यामुळे किडनी, लिव्हरला धोका?

देवेंद्र फडणवीसांना केंद्रात नवी जबाबदारी? दिल्लीत भाजपच्या गोटात हालचाली

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT