Chhagan Bhujbal : शरद पवार यांच्यानंतर अजित पवारांची भेट; छगन भुजबळ यांच्या मनात काय?

Chhagan Bhujbal met Ajit Pawar: शरद पवार यांची भेट घेल्यानंतर छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत.
शरद पवार यांच्यानंतर अजित पवारांची भेट; छगन भुजबळ यांच्या मनात काय?
Chhagan Bhujbal met Ajit PawarSaam Tv
Published On

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. शरद पवार यांची भेट घेल्यानंतर छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत. याबद्दल त्यांनी पत्रकार परिषद घेत माहितीही दिली होती. ते म्हणाले होते की, ''शरद पवार यांच्या भेटीला जात असल्याची माहिती अजित पवार यांना नव्हती.'' यानंतर आता छगन भुजबळ अजित पवार यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. छगन भुजबळ यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.

याआधी आज सकाळी छगन भुजबळ हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. पवारांची भेट घेण्यासाठी त्यांना तब्बल दीड तास वाट पाहावी लागली. भुजबळ पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र त्यांनी स्वतः या चर्चांना पूर्णविराम देत, मराठा- ओबीसी वादावर पुढाकार घेण्यासाठी ही भेट घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं.

शरद पवार यांच्यानंतर अजित पवारांची भेट; छगन भुजबळ यांच्या मनात काय?
Ashish Shelar Letter : 'म्हणून तुम्ही मोरारजी राऊत आहात', संजय राऊतांना आशिष शेलार यांनी लिहिलं खरमरीत पत्र; वाचा...

शरद पवार यांची भेट घेल्यानंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ''राज्यात मराठा- ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. याचे मला मला राजकारण करायचं नसून मला मंत्रीपदाची आशाही आहे. राज्य शांत राहावं, अशी माझी अपेक्षा आहे. त्यासाठीच शरद पवार यांची मी भेट घेतली.''

छगन भुजबळ म्हणाले की, ''आरक्षणाच्या प्रश्नावर शरद पवार 2 दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधतील. आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावंच लागेल, असं पवारांना सांगितलं आहे. पवार म्हणाले, शिंदे-जरांगेंमध्ये काय चर्चा झाली माहिती नाही.''

शरद पवार यांच्यानंतर अजित पवारांची भेट; छगन भुजबळ यांच्या मनात काय?
Jagadguru Shankaracharya: उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राच्या जनतेसोबत विश्वासघात झालाय: जगद्गुरु शंकराचार्य

भुजबळ म्हणाले, ''मी विनंती केली की, तुम्हाला राज्याचा चांगला अभ्यास आहे. यावर पावर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढतो. जातीय वातावरण शांत करण्यासाठी पवार असायला हवेत.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com