Chhagan bhujbal : छगन भुजबळ नाराज आहेत का? शरद पवारांच्या भेटीवर अजित पवार गटाची पहिली प्रतिक्रिया

sunil tatkare on Chhagan bhujbal : छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. या भेटीवर अजित पवार गटाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Chhagan Bhujbal on Sharad pawar meet
Chhagan Bhujbal Saam TV
Published On

मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. छगन भुजबळ यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काल छगन भुजबळ यांनी बारामतीतील सभेतून शरद पवारांवर टीका केली होती. त्यानंतर आज छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. याचदरम्या, दुसरीकडे छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीवर अजित पवार गटाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते असून ते नाराज नसल्याचे स्पष्टीकरण अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार आणि भुजबळांच्या भेटीवर प्रतिकिया दिली आहे. या भेटीवरून सुनील तटकरे यांनी त्यांच्या नाराजीच्या चर्चा फेटाळल्या आहेत. सुनील तटकरे यांनी म्हटलं की, 'छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या परवानगीची गरज नाही. त्यामुळे प्रत्यक्षात त्यांची भेट होईल. त्यानंतर याबाबतीत खुलासा करेल. मला या विषयाची जास्त माहिती नाही. त्यांच्या नाराजीच्या चर्चा या कल्पित आहेत'.

Chhagan Bhujbal on Sharad pawar meet
Chhagan Bhujbal On OBC Reservation: बैठकीनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया!

'छगन भुजबळ हे नाराज असल्याचा प्रश्नच नाही. बारामतीच्या सभेतही ते होते. काहीतरी चुकीचं पसरवलं जात आहे. ते महाराष्ट्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या भेटीवरून वेगळं चित्र पसरवलं जात आहे. त्यांची भेट झाल्यावर तुम्हाला सविस्तर माहिती देईल, असेही तटकरे पुढे म्हणाले. दरम्यान, बारामतीमधील कालच्या वक्तव्यासंदर्भातही छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

Chhagan Bhujbal on Sharad pawar meet
Kolhapur Breaking: 'स्थानिक आमदार सरकारसोबत...,' विशाळगडाच्या अतिक्रमणावरून संभाजी राजेंचा गंभीर आरोप VIDEO

मंत्री बाबा आत्राम काय म्हणाले?

मंत्री बाबा आत्राम यांनीही छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री बाबा आत्राम म्हणाले, 'ते भेटायला गेले, यात काही अडचण नाही. नेते एकमेकांना भेटणे म्हणजे यात राजकीय प्रश्न उपस्थित करण्यासारखं काही नाही. बारमतीत पावसात सभा पार पडली. सभेला लोकांचा प्रतिसाद होता. शरद पवार हे मराठा असून छगन भुजबळ ओबीसी नेते आहेत. दोन्ही नेते भेटत असतील, तर समाजातील उग्र रुप शांत व्हावे, यासाठी भेट होऊ शकते. त्यामुळे दोन्ही समाज एकत्र आले आहेत'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com