Kolhapur Breaking: 'स्थानिक आमदार सरकारसोबत...,' विशाळगडाच्या अतिक्रमणावरून संभाजी राजेंचा गंभीर आरोप VIDEO

Sambhaji Raje Chhatrapati Reaction On Vishalgad Issue: विशाळगडावरील तोडफोड प्रकरणी संभाजी राजे छत्रपतींवर गुन्हा दाखल झालाय. याप्रकरणी संभाजी राजेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
 संभाजी राजे छत्रपती
Sambhaji Raje ChhatrapatiSaam Tv
Published On

रणजित माजगांवकर, साम टीव्ही कोल्हापूर

विशाळगडावरील तोडफोड प्रकरण चांगलंच तापलंय. याप्रकरणी आता संभाजीराजेंसह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल झाल्याचं समोर आलंय. यावर गडकोट किल्ल्यांवरील अतिक्रमण काढणं, ही माझी भूमिका आहे. मी गडकोट किल्यांना निधी दिलाय, असं म्हणत संभाजी राजे छत्रपती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भडकल्याचं समोर आलंय.

अतिक्रमण हा विषय मी उशिरा हाती घेतला, असल्याचं संभाजी राजेंनी (Sambhaji Raje Chhatrapati) म्हटलंय. स्थानिक आमदार हे सरकार सोबत आहेत. त्यांनी या अतिक्रमणाला खातपानी घातल्याचा आरोप संभाजी राजेंनी केलाय. एकही नेता गडकोट विषयी बोलत नसल्याची टीका देखील त्यांनी केलीय. सगळ्या नेत्यांना मी नको असेन तर थांबतो. विशाळगडावर सरकारनेही अतिक्रमण केलं, , अशी प्रतिक्रिया देखील संभाजी राजे यांनी दिलीय.

संभाजी राजे छत्रपती म्हणाले की, काल गजापूर इथं काय घडलं, याची पाहणी प्रशासनाने केली (Vishalgad Issue) पाहिजे. पालकमंत्री यांना जर ही परिस्थिती माहिती असेल, तर त्यांनी पुढाकार का घेतला नाही? असा सवाल संभाजी राजेंनी विचारलाय. त्या ठिकाणी आंदोलन होणार प्रशासनाला माहिती होते, तर त्यांनी का यंत्रणा लावली नाही असाही प्रश्न त्यांनी उपस्थित (Sambhaji Raje Chhatrapati Reaction On Vishalgad) केलाय.

याप्रकरणी आता संभाजी राजेंसह अन्य ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल झाल्याचं समोर (Kolhapur News) आलंय. यावर माझ्यावर गुन्हा दाखल झाला, हे माहिती नाही. जर गुन्हा दाखल झाला असेल तर मी शाहूवाडी पोलीस ठाण्यात जाणार, अशी प्रतिक्रिया संभाजी राजेंनी दिलीय. विशाळगडावर यासिन भटकळ ६ दिवस राहिलेला आहे, याचीही आठवण संभाजी राजेंनी करून दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com