Pune Police Bharti News
Pune Police Bharti News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Police Bharti : मोठी बातमी! पुण्यातील पोलीस भरती २७ फेब्रुवारीपर्यंत स्थगित; काय आहे कारण?

Dnyaneshwar Choutmal

Pune Police Bharti News : पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे पोलीस दलातील पोलीस भरती येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पोलीस भरती प्रक्रिया १८ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे.  (Latest Marathi News)

३ जानेवारीपासून पुणे पोलीस दलातील पोलीस शिपाई, चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात या भरतीची मैदानी चाचणी सुरू असून भरतीला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात उमेदवार येत आहेत.

अशातच, पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पुण्यातील (Pune News) पोलीस भरती २७ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

पुणे पोलीस (Pune Police) मुख्यालयाचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पोलीस भरती प्रक्रिया १८ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत स्थगित करण्यात आली आहे, असं उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितलं आहे.

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. या पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला असून निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडेच सर्वांचंच लक्ष लागून आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Crime News : हुंड्यासाठी कुटूंबातील चौघांची हत्या; बायको, सासू आणि २ मुलांना संपवल्याने परिसरात खळबळ

Udayanraje Bhosale: निवडून दिलं नाही तर मी राजीनामा देईल, पंकजा मुंडेंसाठी उदयनराजे जनतेसमोर नतमस्तक

मतदान होताच नीरेचे पाणी बंद, पंढरपूरसह माळशिरसचे शेतकरी हतबल; रणजितसिंह मोहिते पाटलांनी घातलं लक्ष, साेमवारी...

Arvind Kejriwal News: 'योगींची हकालपट्टी, अमित शहांना पंतप्रधान करण्याचा डाव', अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा

Hair Tips: स्वयंपाकघरातील 'या' दोन गोष्टीमुळे केस होतील लांब

SCROLL FOR NEXT