Aaditya Thackeray Car Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Aaditya Thackeray News: शिवसेनाभवनासमोरच आदित्य ठाकरेंच्या कारला अपघात; भरधाव वेगात दुचाकीस्वार आला अन्...

Aaditya Thackeray Car Accident News: मुंबईच्या दादर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कारला भरधाव वेगात येणाऱ्या बाईकने जोरदार धडक दिली.

साम टिव्ही ब्युरो

Aaditya Thackeray Car Accident News: मुंबईच्या दादर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कारला भरधाव वेगात येणाऱ्या बाईकने जोरदार धडक दिली. दादर येथील शिवसेना भवनासमोरच ही घटना घडली. पोलिसांनी संबंधित बाईकस्वाराला ताब्यात गेतलं असून त्याची चौकशी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे शिवसेना भवनला (Shivsena Bhavan) येत होते. यावेळी त्यांच्यासोबत वाहनांचा ताफा देखील होता. दरम्यान, ताफा शिवसेना भवनच्या दिशेला टर्न घेत असताना, पाठीमागून भरधाव वेगात एक बाईक आली.

काही कळण्याच्या आतच या बाईकने आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या कारला पाठीमागन जोरदार धडक दिली. या धडकेनंतर आदित्य ठाकरे यांनी स्वत: त्या बाईकस्वाराची विचारपूस केली. बाईकस्वाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.

घडलेल्या घटनेनंतर बाईकस्वार हा प्रचंड घाबरला होता. तो पोलिसांच्या (Police) भीतीने पळून जाणाच्या प्रयत्न करत होता. मात्र, आदित्य ठाकरे यांच्या अंगरक्षकांनी त्याला पकडलं. आणि आदित्य ठाकरे यांच्या ताफ्याला जाण्यासाठी रस्ता मोकळा केला. तसेच इतर वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरे (Uddhav Thackeray) कुटुंबियांची सुरक्षा सरकारने कमी केल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, मुंबई पोलिसांनी या बातम्यांचं खंडन केलं. ठाकरे कुटुंबाची सुरक्षा व्यवस्था कमी करण्यात आलेली नाही, असं स्पष्ट केलं होतं.

आदित्य ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा

आदित्य ठाकरे यांना सध्या झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. २०१८ साली राज्य गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना बुलेटप्रुफ स्कॉर्पियो कार, मुंबई पोलिसांमधला एक अधिकारी आणि चार कॉन्स्टेबल असे सुरक्षेचे कर्मचारी तैनात आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO WhatsApp Channel: WhatsApp वर करा एक क्लिक अन् मिळवा PF ची संपूर्ण माहिती; वाचा प्रोसेस

Maharashtra News Live Update: शिरूरच्या निमगाव भोगीत बिबट्याचा धुमाकूळ

Mumbai Metro : मेट्रोचा मोठा निर्णय! मुंबईत २० ऑक्टोबरपर्यंत रात्री उशीरापर्यंत मेट्रो धावणार, मुंबईकरांना दिलासा

Blood pressure monitoring: ब्लड प्रेशर नेमका कधी चेक करावा? दिवसभरातील 'हा' टाइम सर्वात बेस्ट

Kitchen Hacks : मिक्सर, मसाले अन् डब्यांचा पसारा? 'या' ३ ट्रिक्सने किचन दिसेल चकाचक

SCROLL FOR NEXT