Mantralaya  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Drought News : राज्य सरकारचा मोठा, दुष्काळी परिस्थिती उद्भवू नये यासाठी वॉर रुममधून लक्ष ठेवणार

Maharashtra News : सरकार देखील दुष्काळ सदृष परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज झालं आहे.

सूरज सावंत

Mumbai News :

पावसाने ओढ दिल्याने राज्यात दुष्काळ सदृष परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. तर सरकार देखील दुष्काळ सदृष परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज झालं आहे.

दुष्काळी परिस्थिती उद्भवू नये याकरता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रालयातील वॅार रुममध्ये दुष्काळ नियंत्रण वॅार रुम तयार केलं जाणार आहे. सातव्या मजल्यावरील CM वॅार रुममधून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वॉर रुमचा आढवा घेणार

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वॅार रुमचा आढावा घेणार आहेत. दुष्काळाच्या उंबरठ्यावर असेलली गावे, तालुके, जिल्हे, विभाग यावर नजर ठेवली जाणार आहे. दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेली गावं, तालुके, जिल्हे, विभाग वॅार रुमशी जोडले जाणार आहेत.

सरासरीपेक्षा कमी पाऊस

या भागांना दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना सरकारकडून केल्या जाणार आहेत. राज्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने यंदा राज्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवू शकते. यामुळे राज्य सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे.  (Latest Marathi News)

पाणीसाठ्याचे आरक्षण

विशेष अधिकारी नेमून आढावा घेतला जाणार आणि त्यानुसार निर्णय घेतले जाणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणते राज्यातील पाणीसाठा आणि स्त्रोत यांच्या उपलब्धतेनुसार पाण्याचे आरक्षण केले जाणार आहे. नुकतच राज्य सरकारने धरणातील पाणीसाठ्याचे आरक्षण करण्याचे आदेश दिले होते. यानुसार उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी, शेतीसाठी, व्यावसायिक वापराकरता आरक्षित केला जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

MNS Manifesto: आम्ही हे करु! गडकिल्ले, रोजगार ते महिलांची सुरक्षा, मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

SCROLL FOR NEXT