Mahaharashtra Political News  Saam tv
मुंबई/पुणे

Mahaharashtra Politics : एकाच वेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; दोन शिलेदारांचा भाजपमध्ये प्रवेश

Mahaharashtra Political News : केडीएमसी निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गट आणि ठाकरे गटाला भाजपने डबल झटका दिला आहे

Vishal Gangurde

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील दोन बड्या नेत्यांचा भाजप प्रवेश

विजय जोशी आणि शीतल मंढारी यांचा भाजपमध्ये प्रवेश

केडीएमसी निवडणुकीआधी महायुतीत तणाव

महापौर फॉर्म्युल्यावरून शिवसेना गट आणि भाजपमध्ये राजकीय वातावरण तापलं

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण : आगामी केडीएमसी निवडणुकींच्या तोंडावर महायुतीत फोडाफोडीचे राजकारण तीव्र झाले आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही गटांना भाजपने मोठा धक्का दिला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचे विधानसभा सहसंपर्कप्रमुख विजय जोशी आणि ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका शीतल मंढारी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर शक्तीप्रदर्शन करत भाजपमध्ये प्रवेश केला.

हा प्रवेश सोहळा भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या नेतृत्वात पार पडला. या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान युती होणार की नाही, या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी ये पब्लिक है, सब जानती है, असे म्हणत नाव न घेता शिवसेना नेत्यांवर टोला लगावला. तसेच, महापौर भाजपचाच बसणार, असं म्हणत भाजपची शक्ती वाढल्याचा दावा केला.

निवडणुकीआधी महायुतीमध्ये ‘ज्यांचे जास्त नगरसेवक त्यांचाच महापौर’ या फॉर्म्युल्यावरून तणाव वाढला आहे. भाजपकडील हे दोन महत्त्वाचे प्रवेश पाहता, शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही ठिकाणी खळबळ उडाली आहे.

तत्पूर्वी, दोन्ही पक्षातील नेते आणि पदाधिकारी एकमेकांवर आरोप–प्रत्यारोप, दावे–प्रतिदावे करत असल्याने कल्याण–डोंबिवलीतील राजकीय वातावरण निवडणुकीपूर्वी चांगलेच तापले आहे. कार्यक्रमाला भाजप प्रदेशध्यक्ष रवींद्र चव्हाण,आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

भाजपमध्ये कोणत्या दोन नेत्यांनी प्रवेश केला?

शिंदे गटाचे विधानसभा सहसंपर्कप्रमुख विजय जोशी आणि ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका शीतल मंढारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Tourism : मुंबईकरांनो गुलाबी थंडीत पिकनिक प्लान करा, बोरीवलीत आहे २ सुपरकूल ठिकाणं

Maharashtra Live News Update: धावत्या पीएमपीएमएल बसने घेतला अचानक पेट; दिवसभरातील आजची दुसरी घटना

Hair Fall Treatment: केस गळतीसाठी हा चमत्कारिक घरगुती मास्क नक्की लावा; केस होतील घनदाट, लांब आणि सिल्की

Monday Horoscope: पैशांची तंगी होईल दूर, ३ राशींच्या व्यक्तींचे कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics: नांदेडमध्ये मित्रपक्षाला अजितदादांचा दे धक्का; भाजप नेते शरद पवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

SCROLL FOR NEXT