PUNE MNS  Saam TV
मुंबई/पुणे

Pune MNS News : पुण्यात मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Pune Political News : भाजपची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित गटासोबत युती असणार आहे. पण या दोन्ही पक्षांच्या मदतीने ४५ जागा निवडून आणण्यासाठी भाजपने नियोजन सुरु केले आहे.

प्रविण वाकचौरे

अक्षय बडवे

Pune Political News :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर मनसेने देखील तयारी सुरु केली आहे. या दरम्यान पुण्यात मनसेला (MNS) मोठं खिंडार पडलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मनसेचे पदाधिकारी असलेल्या मंदार बलकवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काल भाजपच्या सुपर वॉरियर्स बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. त्यामुळे मनसेला पुण्यात मोठा धक्का बसला आहे.   (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपची पुण्यात आज बैठक

आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनिती आखण्यासाठी भाजपची आज पुण्यात बैठक पार पडत आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातून महायुतीचे ४५ खासदार निवडून आणण्याची घोषणा भाजपच्या नेत्यांनी यापूर्वीच केली आहे.

रणनीती ठरवण्यासाठी व प्रत्यक्षात काम करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय व प्रदेश पातळीवरील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ही बैठक आहे. भाजपची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित गटासोबत युती असणार आहे. पण या दोन्ही पक्षांच्या मदतीने ४५ जागा निवडून आणण्यासाठी भाजपने नियोजन सुरु केले आहे.

राष्ट्रीय संघटक सरचिटणीस बी. एल. संतोष, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, यांच्यासह प्रमुख ६० ते ७० पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांना बैठकीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

SCROLL FOR NEXT