Loksabha Election 2024 : महायुतीत जागावाटपावरुन धुसपूस; अजित पवार गटाचा वर्ध्यातील जागेवर दावा, भाजप खासदाराने सुनावलं

Maharashtra Political News :वर्ध्याची जागा महायुतीत अजित पवार गटाला मिळेल, असं काहीही होणार नाही. वर्धा लोकसभा मतदारसंघात 2014 पासून आजपर्यंत भाजपचे दोनदा खासदार निवडून आले आहेत.
Ramdas Tadas-Ajit PAwar
Ramdas Tadas-Ajit PAwarSaam TV
Published On

चेतन व्यास

Wardha News :

सर्वच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. अशातच महायुतीत अजित पवार गटाने विदर्भातील गोंदिया-भंडारा, गडचिरोली आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर दावा केला आहे. यामुळे आता वर्धा जिल्ह्यात महायुतीत धुसपूस पहायला मिळत आहे. वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस यांनी तर वर्धा जिल्ह्यात अजित पवार गटासोबत कोणीच नाही, असा दावा केला आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जुने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे शरद पवारांसोबत आहेत, असं म्हणत ही जागा भाजपच्या वाट्यालाच येणार असल्याचं तडस यांनी म्हटलंय. एवढंच नव्हे तर वर्ध्यातील जनता ही जिल्ह्याबाहेरील उमेदवाराला पसंत करत नाही, असं म्हणत अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री सुबोध मोहिते यांना टोला लागवला. (Latest Marathi News)

Ramdas Tadas-Ajit PAwar
Mallikarjun kharge: आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस किती जागांवर निवडणूक लढणार? मल्लिकार्जुन खरगे म्हणाले...

अजित पवार यांनी किती जागा मागितल्या हे मी ऐकलं नाही. परंतु अजित पवार हे ज्या पक्षाचे नेते आहे ते भाजपसोबत आहे.हा मतदारसंघ कधीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार नाही. तसही या मतदारसंघात राष्ट्रवादीचं काहीही नाही. या मतदारसंघातील जे जुने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहे ते शरद पवार यांच्यासोबत आहेत. तर अजित पवार यांच्या नवीन राष्ट्रवादीसोबत जिल्ह्यात कोणीच नाही, असंही रामदास तडस यांनी सांगितलं.

वर्ध्याची जागा महायुतीत अजित पवार गटाला मिळेल, असं काहीही होणार नाही. वर्धा लोकसभा मतदारसंघात 2014 पासून आजपर्यंत भाजपचे दोनदा खासदार निवडून आले आहेत. या मतदारसंघातील आमदार, नगरपालिका भाजपची आहे.

Ramdas Tadas-Ajit PAwar
Kalyan Lok Sabha Seat: श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा, कल्याण लोकसभा मतदारसंघाचा घेणार आढावा

या मतदारसंघात बाहेरचा उमेदवार चालत नाही, हे दोन लोकसभा निवडणुकीत जनतेने दाखवून दिलंय. सुबोध मोहिते यांच्यासाठी जरी अजित पवार गटाने उमेदवारी मागितली असेल तरी हा मतदारसंघ भाजपकडे राहणार, असं खासदार तडस यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com