Harshwardhan Sapkal Saam
मुंबई/पुणे

Ambarnath: अंबरनाथमध्ये काँग्रेसला भगदाड, काँग्रेसच्या त्या १२ नगरसेवकांचा मोठा निर्णय

Ambarnath Congress News Update : अंबरनाथ नगरपालिकेतील मोठी राजकीय घडामोड. काँग्रेसकडून निवडून आलेले 12 नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.

Namdeo Kumbhar

Ambernath Congress corporators joining BJP : अंबरनाथ नगरपालिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या 12 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या नगरसेवकांना येत्या दोन ते तीन दिवसात भाजपात प्रवेश दिला जाईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. हे सर्व नगरसेवक अंबरनाथच्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपात प्रवेश करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेत काँग्रेस कडून निलंबित करण्यात आलेले अंबरनाथचे ब्लॉक ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील हेही उपस्थित होते.

अंबरनाथ शहराच्या विकासासाठी तेथील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी काँग्रेसचे निवडून आलेल्या बारा नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलताना दिली.या नगरसेवकांबरोबर अंबरनाथ मधील काँग्रेसचे विविध आजी-माजी पदाधिकारी ही भाजपात प्रवेश करणार आहेत . लवकरच हा प्रवेश पार पडेल अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

यावेळी बोलताना काँग्रेसचे अंबरनाथचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी सर्व नगरसेवकांच्या वतीने बाजू मांडली . केवळ शहराच्या विकासासाठी आम्ही अंबरनाथ विकास आघाडी केली होती. पण आमच्या प्रदेशाध्यक्षांची दिशाभूल करण्यात आली. त्यातूनच मग आमच्यावर पक्षाने विश्वासात न घेता कारवाई केली. केवळ अंबरनाथ शहराच्या विकासाकडे बघून आम्ही भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती यावेळी पाटील यांनी दिली.

रवींद्र चव्हाण काय म्हणाले ?

काँग्रेस मधून निवडून आलेले सर्व नगरसेवक आणि टीम यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला जाणार आहे. एक दोन दिवसात त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी प्रवेश करणार आहेत. त्यांच्या भागातील क्षेत्रामध्ये विकास कारण्यासाठी ते भाजपात प्रवेश करणार आहेत, असे रवींद्र चव्हाण म्हणाले. एमआयएमसोबतची युती ती चुकीची आहे, त्याबाबत खुलासा मागवला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उमरगा तालुक्यातील कदेर परिसरात गारांचा पाऊस, शेती पिकांचे नुकसान

Shocking: क्षणात सर्वकाही संपलं! पिस्तूल छातीवर लावलं अन् ट्रिगर ओढला, रीलच्या नादात तरुणाने गमावला जीव; थरारक VIDEO

Summer Vacation In Satara : मनाला भुरळ घालणारे साताऱ्यातील हिल स्टेशन, कडाक्याच्या उन्हात 'येथे' मिळेल थंडगार हवा

नवी मुंबईत अपघाताचा थरार! धावत्या ट्रेनखाली महिलेने झोकून दिलं; शरीराचे झाले 2 तुकडे

Acid Attack On Minor Girl: सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगरमधील संतापजनक घटना

SCROLL FOR NEXT