big action Military Intelligence and pune police against bangladeshi infiltrators  Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेची मोठी कारवाई; ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक, ११ जणांची चौकशी सुरू

Satish Daud

सचिन जाधव, साम टीव्ही

Pune Crime News

पुण्यातील हडपसर लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने पुणे पोलिसांच्या मदतीने अचानक छापेमारी केली. यावेळी ४ बांग्लादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली. तसेच ११ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांच्या या संयुक्त कारवाईमुळे अवैध्यरित्या राहत असलेल्या बांग्लादेशींचे चांगलेच धाबे दणादणले आहेत. (Latest Marathi News)

पुण्यातील हडपसर परिसरात (Pune News) असलेल्या आदर्श नगरच्या डोंगरात बांग्लादेशी घुसखोर राहत असल्याची माहिती लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. माहिती मिळताच यंत्रणेने पुणे पोलिसांसह परिसरात छापेमारी केली.

यावेळी राम रहीम अली शेख, बाबू मोसिन मंडल, कमरुलू रोशन मंडल, सागर आलम शेख, नजमा बाबू मंडल, आणि अली बाबू मंडळ या बांग्लादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून बनावट कागदपत्र, बनावट भारतीय आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच इतर महत्वाचे कागत्रपदे जप्त करण्यात आले.

तसेच ११ बांग्लादेशी संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्यावर देखील विविध कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासह परिसरात बांग्लादेशी घुसखोरांचे प्रमाण वाढले आहेत.

या घुसखोराच्या मुसक्या आवळण्याची पुणे पोलिसांनी कारवाईची मोहिम आखली आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी परिसरात राहत असलेल्या बांग्लादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी हडपसर पोलिसांनी संशयित नागरिकांकडे बांगलादेश असल्याचा पुरावा नसल्याचे कारण देऊन घुसखोरांना चक्क सोडून दिले होते.

त्यानंतर मिलिटरी इंटेलिजन्स पुढील तपास करून बांगलादेशी घुसखोरांविरोधात सबळ पुरावे गोळा केले. या पुराव्याच्या आधारे ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली. तसेच पुण्यात राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे भारतात आणून त्यांना भारतीय आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र इत्यादी मिळवून देण्याचे मोठे रॅकेट उघड झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

SCROLL FOR NEXT