Bhiwandi News Saam Digital
मुंबई/पुणे

Bhiwandi News : बंदी असतानाही भिवंडीत अवजड वाहनांची वाहतूक; ट्रकने घेतला शिक्षिकेचा बळी, जबाबदार कोण?

Bhiwandi Accident News : भिवंडीत डॉ. एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावर ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. तर महिलेचा पती गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Sandeep Gawade

भिवंडीत पतीसह दुचाकीवरून जात असलेल्या जोडप्याच्या दुचाकीला अवजड वाहनाने जोराची धडक दिली. यात दुचाकीच्या मागे बसलेली जागीच ठार झाली आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावर दुपारी ही घटना घडली. शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाही अवजड ट्रक रस्त्यावर कसे धावतात? असा प्रश्न नागरिकांनी केला असून या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे.

तेहसीन शहाबाज अंसारी (वय अंदाजे २५ ) असं महिलेचं नाव आहे. मृत महिला आपल्या पतीसह महापोली गावातील एका शाळेत शिक्षिकेचे काम करत होती. मागील वर्षभरापूर्वीच तिचा विवाह झाला होता. आज ही महिला पती शहाबाज अंसारी यांच्यासह दुचाकीवरून जात होती. दरम्यान वंजारपट्टी नाका येथील डॉ.एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावर आली असता अवजड ट्रकने धडक दिली. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातात पती शहाबाज वाचला असून त्याला जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शहरात होत असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका व्हावी यासाठी शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र बंदी असतानाही भर दुपारी अवजड वाहने उड्डाणपूलांवरून सोडली जात आहेत. त्यामुळेच आज महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूला अवजड वाहने व वाहतूक पोलिसांचा दुर्लक्षित कारभार जबाबदार असल्याची प्रतिक्रिया शहरातील दक्ष नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Redmi Note 15 5G: 108MP कॅमेरा अन् 5520mAh बॅटरी, गजब आहे Redmiचा स्लीम ट्रीम स्मार्टफोन; Redmi Note 15 5G लॉन्च

Beetroot Benefits: दररोज जेवताना एक बीट खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

मनसेला पुन्हा धक्का; बड्या महिला नेत्याची अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एन्ट्री

Electric geyser explosion: इलेक्ट्रिक गिझर फुटण्यापूर्वी हे संकेत मिळतात

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर बसेल- खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

SCROLL FOR NEXT