Manasvi Choudhary
आपले केस लांब, घनदाट आणि काळेभोर असावे असे प्रत्येक महिलेला व मुलीला वाटते. केस वाढण्यासाठी महिला उपाय करतात. पार्लरची ट्रिंटमेट घेतात.
मात्र कधीकधी बाजारातील केमिकलयुक्त उत्पादनांमुळे केसांची गुणवत्ता खराब होते. केस गळतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी घरगुती रामबाण उपाय सांगणार आहे.
अश्वगंधा हे केसांसाठी वरदान मानले जाते. केसांच्या वाढीसाठी अश्वगंधा तेल तुम्ही लावू शकता.
नियमितपणे अश्वगंधा तेलाने केसांची मालिश केल्याने एक महिन्यात तुमचे केस वाढतील.
अश्वगंधा तेल बनवण्यासाठी तुम्हाला अश्वगंधा, खोबरेल आणि तिळाले तेल हे साहित्य घ्यायचे आहे.
सर्वातआधी गॅसवर लोखंडी भांड्यामध्ये तुम्हाला खोबरेल तेल आणि तिळाच्या तेलामध्ये अश्वगंधा मिसळायचे आहे.
तेल साधारणपणे १५ ते २० मिनिटे गरम करा. नंतर तेल थंड करून एका स्प्रेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा.
आठवड्यातून २ ते ३ वेळा केस धुण्यापूर्वी तुम्ही अश्वगंधा तेलाने केसांची मालिश करा.