Bhiwandi Tuition Teacher Booked  AI Image
मुंबई/पुणे

Shocking : नखाने कान ओरबाडले, रक्त येईपर्यंत मारलं; शिक्षिकेकडून विद्यार्थिनींना बेदम मारहाण

Bhiwandi News : भिवंडीतील मानविक अकॅडमीमध्ये दोन अल्पवयीन मुलींना मारहाण केल्याचा शिक्षिकेवर आरोप. आईच्या तक्रारीनंतर निजामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

फैय्याज शेख, भिवंडी

भिवंडीतील एका खासगी क्लासमध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना शिक्षिकेकडून मारहाण केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अभ्यास आणि गृहपाठ नीट न केल्याच्या कारणावरून मुलींना त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांच्या आईने केला आहे. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील मानविक अकॅडमीमध्ये या दोन्ही मुली ट्युशनसाठी जात होत्या. अभ्यासात चुका झाल्या किंवा गृहपाठ पूर्ण केला नाही, तर शिक्षिका त्यांना मारहाण करत असल्याचे मुलींनी आईला सांगितले होते. यापूर्वीही अशा घटना घडल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याबाबत मुलींच्या आईने शिक्षिकेशी फोनवरून तसेच व्हॉट्सॲपवर संपर्क साधून मुलींना मारू नये, अशी विनंती केली होती.

मात्र, २६ नोव्हेंबर रोजी घरी परतल्यानंतर एका मुलीच्या कानाला दुखापत झाल्याचे आणि त्यातून रक्त येत असल्याचे आईच्या लक्षात आले. आईने याबाबत विचारणा केली असता, ट्युशनमध्ये शिक्षिकेने नखाने कान ओढल्याचे आणि हाताने मारल्याचे मुलीने सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारानंतर मुलीच्या मनात भीती निर्माण झाली आहे. ती ट्युशनला जायला नाही म्हणू लागली, क्लासला जाण्याचे नाव काढताच रडत असल्याचेही आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणी शिक्षिका रिंकू रमेश जैन यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ११८(१) आणि बाल न्याय कायदा २०१५ मधील कलम ७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पालकांनी केलेले आरोप मानविक अकॅडमी प्रशासनाने फेटाळले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास निजामपूर पोलीस करत असून, तपासानंतरच या घटनेमागील सत्य स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akash Deep: टीम इंडियाला मोठा धक्का! दुसऱ्या टेस्टमधून आकाशदीप बाहेर, या खेळाडूला मिळाली संधी

Maharashtra News Live Update: शरद पवार म्हणजे धोकायंत्र- राज ठाकरे

December New Rule : 1 डिसेंबरपासून नियमात होणार मोठे बदल! तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

Kitchen Hacks : कुकरची शिट्टी लवकर येत नाही? वापरा स्वयंपाकघरातील 'ही' १ सोपी ट्रिक

Child Cough Causes: मुलांना दोन आठवड्यांपासून खोकला येतोय? फुफ्फुसांशी संबंधित 'हा' गंभीर आजार असण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT