Kalyan Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: ब्रेकअप केल्याने प्रेयसीला घरात घुसून पेटवलं; कल्याणमधील काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Crime News: प्रेयसीने आपली साथ सोडल्याने तरुणाला राग अनावर झाला.

Ruchika Jadhav

Bhivandi Crime News:

प्रेमाच्या नात्यात फक्त प्रेम नाही तर आदरही असणे गरजेचे आहे. जर प्रेम किंवा आदर नसेल तर त्या नात्याला काहीच अर्थ राहत नाही. अशात भिवंडीमधून एक धक्कादायक घटना समोर आलीये. एका नराधम प्रियकराने आपल्या प्रेयसीला पेटवून दिलंय. मित्राच्या सहाय्याने त्याने प्रेयसीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सुनीजर आणि त्याचा मित्र रमेश या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोन्ही आरोपी उत्तर प्रदेशमधील गोंडा येथील रहिवासी आहेत. २५ वर्षीय तरुणीने आपल्यावर झालेल्या हल्ल्याची तक्रार नारपोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

तरुण आणि तरुणी गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते महिनाभरापूर्वी तरुणीने ब्रेकअप केलं होतं. प्रेयसीने आपली साथ सोडल्याने तरुणाला राग अनावर झाला. त्यामुळे त्याने प्रेयसीला संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने एक प्लान तयार केला.

मित्राच्या साथीने तरुण थेट प्रेयसीच्या घरी पोहचला. महत्वाचं बोलायचंय असं सांगून तो घरात शिरला. नंतर त्याने प्रेयसीवर रॉकेल ओतलं आणि तिला पेटवलं. या घटनेनंतर दोघेही तेथून पळून गेले.

तरुणीच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तींनी तातडीने महिलेच्या घरी धाव घेत तिचे प्राण वाचवले. त्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

नागपूरच्या MIDC मधील पाण्याची टाकी कोसळली, ३ जणांचा मृत्यू, अनेकजण मलब्याखाली

RCF Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; ५५० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Flax seeds: स्किन-हेअर केअर आणि डायबिटीजसह 'हे' आजार होतील कायमचे दूर, रोज सकाळी एक चमचा खा 'या' बिया

Ajit Pawar : नंदुरबारला पावरफुल पालकमंत्री मिळणार? अजित पवारांच्या नावाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT