Dombivali Crime: इराणी चोरट्यांकडून ट्रेनिंग घेत बनले सराईत चोर; दोघे पोलिसांच्या ताब्यात

Dombivali News : इराणी चोरट्यांकडून ट्रेनिंग घेत बनले सराईत चोर; दोघे पोलसांच्या ताब्यात
Dombivali Crime
Dombivali CrimeSaam tv
Published On

अभिजित देशमुख 

कल्याण : मोटारसायकलवर जाऊन पादचाऱ्यांची सोन्याची चैन हिसकावून धूम ठोकणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना (Dombivali) डोंबिवली मानपाडा पोलिसांनी बेडा ठोकल्या. या चोरट्यांकडून ८ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत (Crime News) करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

Dombivali Crime
Nandurbar News: सरकारच्या निर्णया विरोधात आदिवासी समुदाय एकवटला; धनगर समाजाला आदिवासीसींचे आरक्षण देण्याला विरोध

वारिस खान, मोहम्मद कुरेशी अशी या दोन्ही चोरट्यांची नावं आहेत. हे दोघे सराईत गुन्हेगार असून दोघांविरोधात कल्याण, डोंबिवलीसह, नवी मुंबई येथील पोलिस ठाण्यात ९ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. डोंबिवली पूर्वेकडील भोपर परिसरात सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका इसमाची चैन स्नेचिंग करत दोघा चोरट्यानी बाईकवर धूम ठोकली होती. या घटनेत धक्काबुक्की करत फरफटत नेल्याने इसम जखमी झाला होता. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुऱ्हाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील तारमाळे, अविनाश वनवे यांच्या पथकाने या चोरट्यांचा शोध सुरू केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dombivali Crime
Maratha Reservation: आमदार प्रकाश सोळुंके यांच्या कार्यालयासह घरावर दगडफेक; पार्किंगमधील गाड्या जाळल्या

दोघांविरोधात नऊ ठिकाणी गुन्हे दाखल 
सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे या दोन्ही चोरट्यांना बेड्या ठोकल्या. आंबिवली परिसरातील इराणी वस्तीत राहणाऱ्या चोरट्यांकडून ते चैनस्नेचिंग कशी करायची हे शिकले व त्यानंतर त्यांनी चोऱ्या सुरू केल्या. या दोघांविरोधात मानपाडा, डोंबिवली, विष्णुनगर, महात्मा फुले, कल्याण तालुका, कोळशेवाडी पोलीस ठाण्यात एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. तर नवी मुंबई परिसरातील पोलीस स्टेशनमध्ये देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांकडून पोलिसांनी आठ लाख पंधरा हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व एक मोटरसायकल हस्तगत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com