सागर निकवाडे
नंदूरबार : राज्यात सुरू असलेल्या धनगर आरक्षणाच्या मागणीला राज्य सरकार सकारात्मक असल्याचे (Nandurbar) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात आदिवासी (Aadivasi) समाज एकवटला असून जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे आंदोलन करत निषेध केला जात आहे. (Breaking Marathi News)
धनगर समाजाला (Dhangar Reservation) आदिवासी समाजाच्या आरक्षणात समाविष्ट करण्याचा राज्य शासनाचा डाव असल्याचा आरोप करत नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना आणि आदिवासी समुदायाच्यावतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनात नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. आदिवासी समुदायाच्यावतीने तीन टप्प्यात आंदोलन करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात बेमुदत धरणे. त्यानंतर मोर्चाच्या माध्यमातून आवाज सरकारपर्यंत पोहोचवला जाणार आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तर विधानभवनावर पायी मोर्चा
मात्र सरकारने भूमिका कायम ठेवल्यास नंदुरबार जिल्ह्यातून आणि राज्याच्या सर्वच भागातून आदिवासी बांधव पायी मोर्चा काढत मुंबईतील विधानभवनाला वेढा घालतील; असा इशारा आदिवासी समुदायाच्या वतीने विविध संघटनांच्या प्रमुखांनी दिला आहे. धनगर आरक्षणाचा मुद्द्यासोबतच त्यांच्या इतर प्रलंबित मागण्यासाठीही या सोबतच आंदोलन करण्यात येणार असून तालुकास्तरावरही विविध संघटना प्रशासकीय कार्यालयाचा बाहेर धरणे देतील, अशी माहिती अजय गावित यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.