Bhiwandi Crime News Saam Digital
मुंबई/पुणे

Bhiwandi Crime News: सावधान! तुम्ही बनवलेला जिरा राईस बनावट जिऱ्याचा तर नाही ना? भिवंडीत ७ टन बनावट जिरे जप्त

Bhiwandi Crime News: बनावट जिरे बनवून हॉटेल, कॅटरर्स यांना घाऊक विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शांतीनगर पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून 7 लाख 19 हजार 700 रुपये किमतीचे लाकडाच्या भुशापासून बनवलेले 7 टन बनावट जिरे जप्त केले आहे.

Sandeep Gawade

Bhiwandi Crime News

बनावट जिरे बनवून हॉटेल, कॅटरर्स यांना घाऊक विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शांतीनगर पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून 7 लाख 19 हजार 700 रुपये किमतीचे लाकडाच्या भुशापासून बनवलेले 7 टन बनावट जिरे जप्त केले आहे. तसेच 4 लाख रुपये किमतीचा बोलेरो पिकअप आणि पालघर येथील 30 लाख रुपये किमतीची फॅक्टरी मधील यंत्रसामुग्री व कच्चा माल जप्त केला आहे.

भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्थानक हद्दीत दोन व्यक्ती लाखो रुपये किमतीचे बनावट जिरे विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे व त्यांच्या तपास पथकातील पोलीस शिपाई क्षिरसागर यांना मिळाली होती. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांना दिली. गुप्त बातमीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस व अन्न सुरक्षा अधिकारी पथकाने नागाव फातमानगर येथील नव्वद फूट रोड येथे सापळा रचला होता. संशयीत टेम्पो त्याठिकाणी येताच पोलिसांनी टेम्पो अडवून मालाची तपासणी केली असता जिरे आढळून आले. हे जिरे लाकडाचा भुसा, वेगवेगळे रासायनिक पावडरपासून बनवण्यात आले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी जिरे पाण्यात टाकून पाहीले असता ते पूर्णपणे विरघळुन त्यांचे काळे रंगाचे पाणी तयार झाले. माल हा बनावट असल्याची खात्री झाल्याने पोलिसांनी टेम्पो चालक शादाब इस्लाम खान (वय 33 वर्ष रा.नवलीफाटा पालघर पश्चिम) व चेतन रमेशभाई गांधी (वय 34 वर्षे, डहाणुकर वाडी कांदीवली पश्चिम) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तर टेम्पो मधील 80 गोण्या बनावट जिरे साठा जप्त करण्यात आला.

दोघा आरोपींच्या मुसक्या आवळून पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता, चेतन रमेशभाई गांधी याने पालघर जिल्ह्यातील नंडोरे येथील नोव्हेल इडस्ट्रियल इस्टेट येथील आपल्या जागृती एन्टरप्रायजेस येथे अनधिकृत बनावट जिऱ्याची फॅक्टरी सुरू केली होती. त्या फॅक्टरीत बनावट जिरे तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी फॅक्टरीतून बनावट जिरे व बनावट जिरे बनवण्यासाठी लागणारे वेगवेगळ्या रंगाच्या रासायनिक पावडर असे 30 लाख रुपये किंमतीचे साहीत्य जप्त करून फॅक्टरी सिलबंद केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभेसह लोकसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT