Bhaskar Jadhav Latest Statement Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena Melava: शिवसेनेच्या मेळाव्यात भास्कर जाधवांची तोफ धडाडली, भाजपसह शिंदे गटावर हल्लाबोल

गोरेगावच्या नेस्को सभागृहामध्ये आज शिवसेनेच्या वतीने गटप्रमुखांचा भव्य मेळावा घेण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई: गोरेगावच्या नेस्को सभागृहामध्ये आज शिवसेनेच्या वतीने गटप्रमुखांचा भव्य मेळावा घेण्यात आला आहे. राज्यातील सत्तासंघर्षानंतर आणि शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज पहिल्यांदाच जाहीर सभेमध्ये बोलणार आहेत. उद्धव ठाकरे यायच्या आधी उपस्थित गटप्रमुखांना संबोधित करताना शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले, शिवसेनेने अडीच वर्षात फक्त विकासाचं राजकारण केलं. शिवसेना प्रमुखांनी दिलेला शब्द ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा शब्द पाळला.

पाहा व्हिडीओ -

मात्र, काही दिवसांपुर्वी केंद्रीय मंत्री महाराष्ट्रात येऊन सांगतात की, 'मुंबई महापालिकेवर आपली सत्ता हवी आहे. ते त्यांचं जुने स्वप्न आहे. ही मुंबई महाराष्ट्र मिळवून देण्यासाठी १०६ लोकांनी हौतात्म्य पत्करलं आणि मग मुंबई मिळवली आहे. या आपल्या मुंबईवर त्यांचा डोळा आहे. काही लोकांचा हव्यास आहे.

मनातील हेतू साध्य करायला महापालिका हवी आहे. पण या देशाच्या आर्थिक राजधानीवर शिवसेना भगवा फडकणार असल्याचा विश्वास जाधव यांनी यावेळी व्यक्त केला. शिवाय उद्धव ठाकरे आजारी असताना या गद्दारांनी साथ द्यायची सोडून पाठित खंजीर खूपसला असं म्हणत जाधवांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT