ACमुळे वाढतंय तुमचं वजन? काय म्हणतात तज्ज्ञ?

Bharat Jadhav

ACच्या वातावरणात का राहू नये?

AC असलेल्या ठिकाणी दीर्घकाळ बसण्याची सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते. कृत्रिमरीत्या थंड केलेल्या वातावरणात सतत राहण्याने तुमच्या चयापचय क्रियेवर, ऊर्जेच्या पातळीवर परिणाम होत असतो.

चयापचय क्रिया मंदावते

यातील मुख्य चिंतेची बाब म्हणजे शरीराच्या नैसर्गिक 'थर्मोरेग्युलेशन'मध्ये होणारी घट. जेव्हा आपण सतत थंड वातावरणात राहतो, तेव्हा शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीर कमी कॅलरीज खर्च करते. यासह दीर्घकाळ बसून राहिल्याने चयापचय क्रिया मंदावू शकते आणि शरीरात चरबी साचू शकते.

वजन वाढते

बऱ्याचवेळा एसी असलेल्या ठिकाणी आपण उबदार ब्लँकेट गुंडाळून बसतो. यामुळे हालचाल आणि शारीरिक हालचाल कमी होते, ज्याचा परिणाम वजन वाढण्यामध्ये होऊ शकतो. जर तुम्ही ही सवय दीर्घकाळ कायम ठेवली, तर तुमची चयापचय क्रिया मंदावून शरीरात लक्षणीय बदल होतात. तसेच वजन वाढू लागते.

थकवा जाणवतो

एसी असलेल्या ठिकाणी बराच वेळ घालवल्याने अधिक थकवा जाणवतो. एसीमधील हवा (री-सर्कुलेटेड) सतत फिरत असल्यामुळे फ्रेश ऑक्सिजनची कमी असते. यामुळे थकवा, डोकेदुखी आणि आकलन करण्याच्या क्षमतेत कमी होऊ शकते. थकवा, डोकेदुखी, कोरडेपणा आणि एकाग्रतेचा अभाव यांसारखी लक्षणेही दिसून येतात. कारण AC ची हवा आपल्या शरीरातील ओलावा शोषून घेते.

गंभीर समस्या उद्भवू शकतात का?

एसी असलेल्या ठिकाणी अधिक वेळ बसल्याने आपल्याला श्वास घेण्यास त्रास होऊ शकते. वारंवार होणारे संसर्ग यांसारखे त्रास होऊ शकतात, अशा बंदिस्त जागांमध्ये हवा पुन्हा पुन्हा फिरत राहते. यासह स्नायू आणि हाडांशी संबंधित समस्यांचाही धोका जाणवू असतो.

धोक्याचा इशारा देणारी लक्षणे

सततचा थकवा, डोकेदुखी, घसा कोरडा पडणे,

वारंवार होणारी सर्दी, कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय हळूहळू वाढणारे वजन

उपाय काय

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून भरपूर पाणी प्या.

दर तासाला थोडा वेळ विश्रांती घ्या आणि शरीराची हालचाल किंवा स्ट्रेचिंग करा.

विश्रांतीच्या वेळी थोडी ताजी हवा घेण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Fenugreek Seeds: सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मेथीदाणे खा; ५ समस्यांपासून मिळेल आराम