Manasvi Choudhary
तांदळाची भाजीला तांदळी, तांदुळजा या नावाने देखील ओळखले जाते. तांदळाची भाजी ही गावरान पद्धतीची पौष्टिक आणि चवदार रानभाजी आहे.
पचायला हलकी असल्याने पावसाळ्यात तांदळाची भाजी गुणकारी मानली जाते. घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
तांदळाची भाजी बनवण्यासाठी तांदळाची भाजी, लसूण, तेल, मीठ, हिरवी मिरची हे साहित्य घ्या.
भाजी बनवण्यासाठी सर्वातआधी तांदळाची भाजी स्वच्छ निवडून धुवून घ्या. नंतर भाजी बारीच चिरा.
गॅसवर कढईत तेल गरम झाल्यावर जीरे, मोहरी, मिरची मिक्स करून चांगली परतून घ्या. नंतर त्यात उभा चिरलेला कांदा मिक्स करून चांगला परतून घ्या.
नंतर या मिश्रणात बारीक कापलेली भाजी मिक्स करा. भाजी वाफेवर शिजवून घ्या.
भाजी शिजली की त्यात चवीनुसार मीठ घाला म्हणजे घरच्या घरी सोप्या पद्धतीने तांदळाची भाजी तयार होईल.