Manasvi Choudhary
पावसाळा सुरू झाला की बाजारात अनेक प्रकारच्या रानभाज्या पाहायला मिळतात, ज्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतात.
करटुले ही भाजी सर्वांनाच माहित आहे. कर्टुल्याच्या भाजी अनेक प्रकार केले जातात आज आम्ही तुम्हाला कर्टुल्याची सुक्की आणि झणझणीत रेसिपी सांगणार आहोत.
कर्टुल्याची भाजी बनवण्यासाठी कर्टुले, कांदा, टोमॅटो, आलं- लसूण पेस्ट, हिरवी मिरची, हळद, मसाला, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, तेल मोहरी आणि जिरे हे साहित्य घ्या.
भाजी बनवण्यासाठी सर्वातआधी कर्टुली स्वच्छ धुवून पातळ उभी चिरून घ्या. कांदा देखील बारीक उभे चिरून घ्या.
गॅसवर कढईत तेल गरम झाल्यावर जीरे, मोहरी, मिरची मिक्स करून चांगली परतून घ्या. नंतर त्यात उभा चिरलेला कांदा मिक्स करून चांगला परतून घ्या.
नंतर या मिश्रणात आलं-लसूण पेस्ट परतून घ्या. थोडे मीठ, हळद, तिखट मिक्स करून परतून घ्या.
मिश्रणात बारीक चिरलेली कर्टुले मिक्स करा. नंतर त्यात झाकण ठेवून शिजवून घ्या
भाजी शिजली की त्यात ओल्या खोबऱ्याचा किस मिक्स करा. म्हणजे भाजीला चव येईल.
अशाप्रकारे गरमा गरम कर्टुल्याची सुकी भाजी तयार होईल.