Manasvi Choudhary
घोसाळ्याची भाजी म्हटली की अनेक जण नाक मुरडतात. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत अनेकांना घोसाळ्याची भाजी आवडत नाही.
तुम्हालाही घोसाळ्याची भाजी आवडत नसेल तर तुम्ही घोसाळ्याची कुरकुरीत भजी ही रेसिपी ट्राय करू शकता.
घोसाळ्याची भाजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच ही रेसिपी बनवू शकता.
घोसाळे भजी बनवण्याची घोसाळे, बेसन, तांदळाचे पीठ, ओवा, हळद, मसाला, जिरे, कोथिंबीर, तेल, मीठ हे साहित्य घ्या.
घोसाळ्याची भजी बनवण्यासाठी सर्वातआधी घोसाळ्याची वरची साल काढा. त्यानंतर घोसाळ्याचे बारीक गोलाकार काप करा.
एका मोठ्या भांड्यात बेसन आणि तांदळाचे पीठ घ्या. त्यात ओवा, जिरे, हळद, लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला.
या मिश्रणात एक छोटा चमचा गरम तेल टाका यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील. ridge gourd
नतंर या मिश्रणात थोडे पाणी मिक्स करा. मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
गॅसवर कढईत गरम तेलात घोसाळ्याची भजी चांगली फ्राय करून घ्या. भजी दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.