Gadchiroli News: धक्कादायक घटना! सती नदीत बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू; कुरखेडा तालुक्यात शोककळा

Three Children Drowned: गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आलीय. सती नदीत अंघोळ करताना शालेय वयातील तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला.
Three Children Drowned:
Three children drown in Sati River Gadchiroli
Published On
Summary
  • सती नदीत बुडून तीन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

  • चार विद्यार्थी आंघोळीसाठी नदीवर गेले होते.

  • पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे खोल पाण्यात बुडाले.

गडचिरोली जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी हाती आलीय. कुरखेडा तालुक्यातील राणी खेडेगाव येथे सती नदीत बुडून तीन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. शनिवारी दुपारी धान रोवणीसाठी पालक शेतात गेले असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चार विद्यार्थी आंघोळीसाठी सती नदीवर गेले.

Three Children Drowned:
Gadchiroli : गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; नक्षल्यांचा म्होरक्या भूपतसह 61 जण शरण | VIDEO

नदीतील पाण्याची खोली आणि तीव्र प्रवाहाचा अंदाज न आल्याने तिघे विद्यार्थी खोल पाण्यात बुडाले. त्यांच्यासोबत असलेल्या चौथ्या विद्यार्थ्याने प्रसंगावधान राखत गावात धाव घेऊन मदत मागितली. गावकऱ्यांनी तातडीने नदीत शोधमोहीम राबवून तिन्ही विद्यार्थ्यांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत लक्ष्मण सुन्हेर दूधकवर (६), कुणाल रमेश दूधकवर (५) आणि मोहित हिवराज सराटे (११) या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

Three Children Drowned:
Rain Alert : भीमा-नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस; उजनी, वीर धरणांतून मोठा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

घटनेची माहिती मिळताच पुराडा पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर राणी खेडेगावमध्ये शोककळा पसरली असून, पावसाळ्यात नदी-नाल्यांपासून लहान मुलांना दूर ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने पुन्हा एकदा केले आहे.

 गडचिरोलीत पावसाचा कहर

गेल्या दोन-तीन दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यातील मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे आलापल्ली–सिरोंचा आणि आष्टी–आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गांसह कुरखेडा, एटापल्ली, धानोरा, मुलचेरा, अहेरी, चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज, भामरागड आणि गडचिरोली तालुक्यातील अनेक राज्य महामार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांवर पाणी आले होते. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने पुलांवरून पाणी वाहत असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com