New BEST Electric Bus Routes to Ease Travel Saam
मुंबई/पुणे

आता मिस नाही होणार तुमची लोकल! 'बेस्ट' सेवा वेळेत पोहचवणार स्थानकावर

New BEST Electric Bus Routes to Ease Travel: बेस्टकडून प्रवाशांसाठी खास लवकरच रेल्वे आणि मेट्रो स्थानकांना थेट जोडणाऱ्या नवीन बससेवा सुरू करण्यात येणार आहे. या बससेवेमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होईल.

Bhagyashree Kamble

  • मुंबईकरांचा प्रवास आणखी सोपा होणार

  • रेल्वे अन् मेट्रो स्थानकावर पोहोचा वेळेत

  • बेस्टची नवी बससेवा

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी. शहरातील प्रवास आता आणखी सुलभ होणार आहे. कारण, बेस्टकडून रेल्वे आणि मेट्रो स्थानकांना थेट जोडणाऱ्या नवीन बससेवा सुरू करण्यात येणार आहेत. या बससेवेमुळे प्रवाशांना वेळेत रेल्वे स्थानक किंवा मेट्रो स्थानक गाठता येणार आहे. मुख्य म्हणजे, अंधेरी, जोगेश्वरी, कुर्ला (पूर्व-पश्चिम), वांद्रे, बोरिवली आणि कांदिवली यांसारख्या प्रमुख उपनगरीय स्थानकांपर्यंत पोहोचणं अधिक सोयीचं होणार आहे.

ही बससेवा रेल्वे आणि मेट्रो स्थानकांना जोडणारं असेल. मुंबईतील काही रेल्वे स्थानकांसह मेट्रोतील काही स्थानकांनाही ही बससेवा जोडणारी असेल. ही बससेवा मेट्रो मार्गिका क्रमांक १, २ए, ७ अन् ३ यांनाही जोडली जाणार आहे. बेस्टकडून सुरू करण्यात येणाऱ्या या बससेवेमुळे दररोज सुमारे २ लाख प्रवाशांना फायदा होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बससेवा केवळ रेल्वे स्थानकांपुरत्या मर्यादित नसून मुंबईतील प्रमुख मेट्रो मार्गांनाही जोडणारे आहेत. या बससेवेमुळे दररोज सुमारे १ लाख ९० हजार प्रवाशांना फायदा होणार आहे. तसेच गर्दीचा त्रास आणि वेळेचीही बचत होणार आहे. तसेच वेळेत रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानक गाठता येणार आहे.

ही बस नवीन सुविधेसह प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू करण्यात येणार आहे. नवीन इलेक्ट्रिक बस ज्येष्ठ तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सुविधांसह दाखल झाल्या आहेत. या बसमध्ये एकूण ३९ आसनांची क्षमता असून, २० प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतात, एवढी बसमध्ये जागा असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबरनाथ मध्ये भीषण अपघात, कार चालकानं ३ दुचाकीस्वारांना चिरडलं

Rahul Gandhi: राहुल गांधींना कोर्टाचा मोठा दिलासा! थेट खटलाचा रद्दा; नेमकं प्रकरण काय? VIDEO

Chanakya Niti: 'या' 5 कर्मांमुळे पैशाची तंगी भासणार; समजूतदार लोक कधीच करत नाहीत ही चूक, वाचा चाणक्यांचा सल्ला

CIDCOपूर्ण करेल तुमच्या घराचं स्वप्न; ४ हजार ५०८ घरांची गृहनिर्माण योजना जाहीर

Bihar Ministers portfolios: बिहारमध्ये 'नो महाराष्ट्र पॅटर्न'! खातेवाटपात उलटफेर; CM नितीश कुमारांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT