ASI पोलिसाची धारदार शस्त्राने हत्या, निर्जनस्थळी रक्ताळलेल्या अवस्थेत फेकून दिलं, पोलीस दलात खळबळ

Assistant Sub-Inspector Found Dead: बिहारमधील सिवान येथून धक्कादायक बातमी समोर. एएसआय अनिरूद्ध कुमार यांची धारदार शस्त्राने हत्या. हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिलं.
Assistant Sub-Inspector Found Dead
Assistant Sub-Inspector Found DeadSaam
Published On
Summary
  • एएसआय अनिरूद्ध कुमार यांची शस्त्राने हत्या.

  • मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिलं.

  • हत्या करण्यामागचं कारण काय?

  • पोलिसांकडून तपास सुरू.

बिहारमधील सिवान येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका सहाय्यक उपनिरीक्षकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. नंतर त्यांचा मृतदेह निर्जनस्थळी फेकून देण्यात आलं. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली. या घटनेनंतर पोलीस विभागात शोककळा पसरली आहे. पोलीस आरोपीच्या शोधात आहे.

दरौंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून तैनात असलेले अनिरूद्ध कुमार यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. अनिरूद्ध कुमार हे सिव्हिल ड्रेसमध्ये होते. ते रात्रीच्या सुमारास जात होते. त्याचवेळी धारदार शस्त्राने वार करत त्यांचा मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिला. मिळालेल्या माहितीनुसार, दरौंदा पोलीस स्टेशन परिसरात सिरसा नवका टोला येथे एएसआयचा मृतदेह आढळून आला.

Assistant Sub-Inspector Found Dead
मोठी बातमी! माजी उपमुख्यमंत्र्यांच्या घरात फूट; भावानं धरली भाजपची वाट, शरद पवार गटाला धक्का

कुमार यांचा खून धारदार शस्त्राने केला असल्याचं समोर आलं. या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवलं. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. तसेच पोलीस विभागात शोककळा पसरली आहे. पोलीस सध्या आरोपीच्या शोधात आहेत.

Assistant Sub-Inspector Found Dead
ट्रक भरधाव वेगात आला अन् वाहनांना उडवत गेला, पुण्यात भीषण अपघाताचा थरार

आरोपीनं पोलिसावर नेमका हल्ला का केला? ही हत्या वैर की आणखी काही..? हत्या करण्यामागचं कारण काय? याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, अनिरूद्ध कुमार यांच्या हत्येनंतर कुमार कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिंकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com