Kalyan News Saam TV
मुंबई/पुणे

Kalyan News : चोरीच्या तक्रारीची विचारणा करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पत्नीसह आईला मारहाण केल्याचा आरोप, व्हिडीओ व्हायरल

Video Viral : विष्णूनगर पोलिस ठाण्यात सुरु असलेल्या गोंधळाचा व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत जाधव

Kalyan News : घरात चोरी झाली, पोलिस ठाण्यात तक्रार दिली, पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला. मात्र ९ महिन्यांनंतरही काही होत नाही. यासाठी जाब विचारण्याकरता गेलेल्या तक्रारदार तरुण, पत्नी आणि आईला पोलिसांकडून बेदम मारहाण केल्याचा आरोप राज शेट्ये नावाच्या तरुणाने केला आहे. धक्कादायक म्हणजे विष्णूनगर पोलिस ठाण्यात सुरु असलेल्या गोंधळाचा व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला आहे.

एकतर पोलीस तपास करत नाही. दुसरीकडे मला पत्नी आणि आईला मारहाण केली जात आहे. हा कुठला न्याय असा सवाल तरुणाने उपस्थित केला आहे. तर याबाबत विष्णू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी आम्ही त्याला कुठली मारहाण केली नाही.

त्याच्या घरी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याचा तपास सुरु केला आहे. तो तरुण पोलिस ठाण्यात येतो आणि पोलिसांसोबत हुज्जत घालतो. त्यामुळे आम्ही त्याला आणि त्याच्या पत्नी व आईला बाजूला बसवले होते, असे सांगितले. मात्र व्हिडीयोत जो प्रकार समोर आला आहे तो अतिशय धक्कादायक आहे. (Maharashtra News)

डोंबिवली पश्चिमेतील स्वामी शाळेजवळ जय श्रीनाथ कृपा सोसायटीत राहणारे राज शेट्ये हा त्याच्या आईसोबत राहतो. राज शेट्ये यांनी डिसेंबर २०२२ मध्ये त्याच्या घरीतील ११ तोळे दागिने चोरी झाल्याची तक्रार केली. त्याच्या जवळच्या नातेवाईक महिलेने चोरी केल्याचा आरोप शेट्ये यांनी केला होता. पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.

या प्रकरणात अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे शेट्ये आणि त्याची आई पोलीस ठाण्यात जाब विचारयला जातात. आमच्या प्रकरणाच्या तपासाचे पुढे काय झाले. सोमवारी तो त्याची पत्नी आणि आईसह जाब विचारण्यासाठी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गेले होते. या दरम्यान त्याच्यासह पत्नी आणि आईला पोलिसांनी मारहाण केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (Crime News)

पोलिसांनी कशा प्रकारे या दोघांना वागणूक दिली याचा फेसबूक लाईव्हही शेट्ये याने केला आहे. या प्रकरणात विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी सांगितले की, आम्ही त्याला कुठली मारहाण केली नाही. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याचा तपास सुरु केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport : सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज! 'या' तारखेपासून सुरू होणार विमानसेवा, मुंबई-गोव्याला काही तासात पोहचणार!

SCROLL FOR NEXT