Sharad Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Baramati Politics: विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु; बारामतीचा 'दादा' बदला, कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी

Activist Demands To Sharad Pawar: लोकसभेनंतर शरद पवार आज बारामतीत कार्यकर्त्यांना भेटत आहे. तेव्हा कार्यकर्त्यांनी आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, अशी मागणी केली आहे.

Rohini Gudaghe

नितीन पाटणकर, साम टीव्ही बारामती

लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात रोज नवीन नवीन घडामोडी घडत आहेत. आता कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे 'आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे,' अशी मागणी केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना मोठं उधाण आलं आहे. लोकसभेच्या निकालानंतर बारामतीत राजकीय हालचाली वाढल्या आहेत.

लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर शरद पवार बारामतीतील गोविंद बागेत आज सकाळपासून कार्यकर्त्यांना भेटत आहेत.त्यांना भेटण्यासाठी लोकांची गर्दी होत (Baramati Politics) आहे. युगेंद्र पवारांचे युवा कार्यकर्ते आज शरद पवारांना भेटले आहेत. यावेळी त्यांनी बारामतीचा दादा बदला, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे. युगेंद्र पवारांचे काम चांगलं असल्याचं स्पष्टीकरण यावेळी कार्यकर्ते देताना दिसले आहेत.

युगेंद्र पवारांचे कार्यकर्ते नेमकं काय म्हणाले?

युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हे बारामतीत लक्ष घालत आहेत. लोकांच्या समस्या जाणून त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एक नवीन चेहरा तुम्ही बारामतीसाठी द्यावा, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली आहे. हातवारे करत शरद पवारांनी उमेदवारीची चर्चा करू नका, लवकरच होईल असं म्हणत कार्यकर्त्यांना (NCP) संयमी राहण्यास सांगितलं आहे.

बारामतीत विधानसभेची मोर्चे बांधणी

बारामतीत विधानसभेची मोर्चेबांधणी सुरु झाल्याचं दिसत आहे. आता विधानसभेसाठी कार्यकर्ते युगेंद्र पवारांसाठी आग्रही असल्याचं दिसत आहे. त्यामुळे बारामतीमध्ये आता विधानसभेसाठी देखील चुरस वाढणार, अशी चिन्हे दिसत आहेत. गेल्यावर्षी जुलै महिन्यात अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांविरुद्ध बंड करत महायुतीमध्ये सामील झाले होते. परंतु लोकसभेत त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही, आता काही कार्यकर्ते बारामतीत दादा बदलण्याची मागणी करत असल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? भाजपसोबतच्या तणावादरम्यान मंत्र्याचं मोठं विधान

Zodiac signs prediction: आजचा दिवस चार राशींसाठी बदल घडवणारा! निर्णय, नोकरी आणि प्रवासात मिळणार यश

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Cyclone Alert : महाराष्ट्र पुन्हा गारठणार! चक्रीवादळामुळे बदलतंय हवामान, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

8th Pay Commission: कामाची बातमी! आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती होणार? तुमचा पगार किती वाढणार? वाचा कॅल्क्युलेशन

SCROLL FOR NEXT