भरत मोहोळकर, साम टीव्ही
मुंबई : लोकसभेला सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यानंतर आपण विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं अजित पवारांनी जाहीर करून टाकलं होतं. अजित पवारांनी निवडणूक न लढण्याच्या भूमिकेनंतर त्यात आता चांगलाच ट्वीस्ट आलाय. तर दादांच्या भूमिकेवरून कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी थेट अजित पवारांचा ताफा अडवत बारामतीतूनच निवडणूक लढवण्याचा आग्रह धरलाय...यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय..
बारामतीसाठी योग्य उमेदवार देण्याचे संकेत अजित पवारांनी दिले असतानाच दादांच्या पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेलांनी अजित पवारांची उमेदवारी जाहीर करून टाकलीय.. तर प्रफुल्ल पटेलांनी अजित पवारांची उमेदवारी जाहीर केल्याने संजय राऊतांनी चांगलंच तोंडसुख घेतलंय.
लोकसभेला पराभव झाला तर विधानसभा न लढवण्याचा दादांचा शब्द
बारामतीतून जय पवारांना उमेदवारी देण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह
लोकसभेप्रमाणे पुन्हा पवार कुटूंबात लढत होऊ न देण्याचा प्रयत्न
बारामतीत अडकून पडल्यास इतर उमेदवारांसाठीच्या प्रचारावर मर्यादा येण्याची शक्यता
बारामतीच्या उमेदवारीसाठी अजित पवारांची नकारघंटा कायम असली तरी आता प्रफुल्ल पटेलांनी उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे बारामतीत पुतण्या युगेंद्र पवार विरुद्ध काका अजित पवारांमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेलांनी जाहीर केलेली उमेदवारी दादा मान्य करणार की लोकसभेला दिलेला शब्द पाळणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.